Home /News /sport /

धोनीच्या मुलीला मिळालेल्या धमकीबाबत शाहिद आफ्रिदीने दिली अशी प्रतिक्रिया

धोनीच्या मुलीला मिळालेल्या धमकीबाबत शाहिद आफ्रिदीने दिली अशी प्रतिक्रिया

धोनीची मुलगी झिवा हिला धोनीची पत्नी साक्षी हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी धोनीला पाठिंबा दर्शवला होता. याबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 (IPL 2020) मध्ये सध्या अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) आणि श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) भन्नाट फॉर्ममध्ये आहे. परंतु तीन वेळा चॅम्पियन आणि स्पर्धेतील सर्वाधिक मजबूत समजली जाणारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) अजूनपर्यंत फॉर्ममध्ये आलेली नाही. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईला आतापर्यंत 5 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. कोलकात्याविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर संघाला ट्रोल केलं जात आहे. त्याचबरोबर ट्रोलर्सनी सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीच्या कुटुंबावरही टीका केली आहे. धोनी चांगला खेळला नाही तर त्याची मुलगी झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी देणारी पोस्ट एका ट्रोलरनी केलं होतं. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता. या धमकीनंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने भाष्य केलं आहे. (हे वाचा-डिव्हिलिअर्स आणि विराटने शतकी भागीदारीसोबत केला 'हा' विक्रम) धोनीची मुलगी झिवा हिला धोनीची पत्नी साक्षी हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी धोनीला पाठिंबा दर्शवला होता. त्याचबरोबर धोनीच्या फार्महाऊसबाहेर सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. तसंच अनेक खेळाडूंनी देखील धोनीला पाठिंबा दर्शवत ही गोष्ट चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा-IPLमध्ये खेळाडू करत आहेत 'चुकी'चं काम? नाडा करणार क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट) यामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने या धमक्यांवर भाष्य केलं आहे. या विषयी आफ्रिदी म्हणाला की, ‘धोनीने भारतीय संघासाठी आणि क्रिकेटसाठी केलेलं कार्य विसरण्यासारखं नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर असे वागणं बरोबर नाही.’  पाकिस्तानमधील पत्रकार साज सादिक यांनी आपल्या ट्विटरवरून यासंदर्भात ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे, ‘धोनीच्या कुटुंबाला आणि धोनीला कोणत्या प्रकारची धमकी आली आहे हे मला माहीत नाही. पण हे बरोबर नाही. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये सीनिअर आणि जुनिअर खेळाडूंना एकत्र ठेवण्याचं उत्तम काम केलं आहे. यामुळं त्याच्याबरोबर असा व्यवहार होणं बरोबर नाही'. (हे वाचा-Mr. 360 ने केली कमाल! असा सिक्सर मारला की शारजामध्ये झालं ट्रॅफिक जाम) पोलिसांनी या प्रकरणी गुजरातच्या कच्छमधून एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पोलिसांनी मागील आठवड्यात गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने धमकी दिल्याचे कबूल केलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Shahid Afridi

    पुढील बातम्या