IPL सोडून पाकिस्तानला जाणार हा दिग्गज, न्यूझीलंडला पोहचवलं होतं फायनलमध्ये

वयाच्या 22 व्या वर्षी प्रशिक्षक म्हणून कारकिर्द सुरु करणाऱ्या या दिग्गजाने न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 09:48 AM IST

IPL सोडून पाकिस्तानला जाणार हा दिग्गज, न्यूझीलंडला पोहचवलं होतं फायनलमध्ये

मुंबई, 09 ऑगस्ट : वर्ल्ड कपनंतर अनेक देशांच्या क्रिकेट संघात बदल होत आहेत. भारताच्या प्रशिक्षकाची निवड लवकरच होणार आहे. भारताशिवाय इतरही देशांनी संघव्यवस्थापनात बदल करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांचाही करार संपला असून त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची निवड होणार आहे. यासाठी न्यूझीलंड आणि आयपीएलमधील किंग्स इलेव्हन संघाचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांचे नाव चर्चेत आहे. पाकचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांना मुदतवाढ नाकारल्यानंतर लगेचच माइक हेसन यांनी पंजाबचे प्रशिक्षकपद सोडलं आहे. मात्र, पाकच्या प्रशिक्षकपदाबद्दल त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

माइक हेसन यांनी भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे. या शर्यतीत रवी शास्त्रींचे पारडे सध्यातरी जड आहे. कर्णधार विराट कोहलीनं शास्त्रींना पसंती दिली आहे. तसेच निवड समितीसुद्धा भारतीय प्रशिक्षक असावा असंच म्हणत आहे. अशा परिस्थितीत हेसन पाकच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं जात आहे.

माइक हेसन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. न्यूझीलंडच्या डुनेडिनमध्ये जन्म झालेल्या हेसन यांनी 15 वर्ष ओटागो क्रिकेटसाठी काम केलं. याकाळात त्यांना ओटागोला 20 वर्षांनी विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 2011 च्या वर्ल्ड कपनंतर वर्षभर केनियाचं प्रशिक्षकपद सांभाळलं. त्यानंतर 2012 ला न्यूझीलंडचे प्रशिक्षक झाले.

न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून माइक हेसन यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड 2015 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचला होता. याशिवाय 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्येही सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. तसेच 2018 मध्ये इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत करून न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचले होते.

कौटुंबिक कारणानं माइक हेसन यांनी कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला होता. हेसन यांनी यंदाच्या आयपीएल हंगामात पंजाबच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांनी पंजाबचे प्रशिक्षकपद सोडलं आहे.

Loading...

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...