मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची T20 वर्ल्ड कपपूर्वी तडकाफडकी निवृत्ती

मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची T20 वर्ल्ड कपपूर्वी तडकाफडकी निवृत्ती

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 2020 मध्ये आयपीएल चॅम्पियन होण्यात मोलाची भूमिका बजावणारा फास्ट बॉलरनं टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर:  मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 2020 साली आयपीएल चॅम्पियन (IPL 2020 Champion) होण्यात मोलाची भूमिका बजावणारा फास्ट बॉलर जेम्स पॅटीन्सन (James Pattinson) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. 31 वर्षाच्या ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलरची T20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड झाली नव्हती. पण तो इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या अ‍ॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू होता.

पॅटीन्सनच्या क्रिकेट करिअरला दुखापतींचा मोठा फटका बसला. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यानं आजवर 21 टेस्ट, 15 वन-डे आणि 4 आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. पाठ दुखीमुळे तो गेले काही काळ क्रिकेटपासून दूर होता. पॅटीन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात जोरदार केली होती. त्याला 2011 साली न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये 'प्लेयर ऑफ द सीरिज' हा पुरस्कार मिळाला होता.

पॅटीन्सननं 2015 साली शेवटची वन-डे मॅच खेळली होती. त्यानंतर त्याच्या करिअरला दुखापतीचं ग्रहण लागलं. त्यानंतर 2019 साली त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. इंग्लंडमध्ये झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये तो खेळला. आता यापुढील काळात राज्याकडून क्रिकेट खेळणार असल्याचं तसंच नव्या फास्ट बॉलर्सना मदत करणार असल्याचं त्यानं सांगितलं.

न्यूझीलंडच्या अंपायरचं झालं निधन, वेस्ट इंडिजच्या बॉलरनं दिली होती धडक

मुंबई इंडियन्सचा होता सदस्य

पॅटीन्सन आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. त्या आयपीएलमध्ये त्यानं 10 मॅचमध्ये 9.09 च्या इकोनॉमी रेटनं 11 विकेट्स घेतल्या होत्या. यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावापूर्वी (IPL 2021 Auction) मुंबई इंडियन्सनं त्याला करारमुक्त केलं. त्यानंतर या सिझनसाठी त्याला कोणत्याही आयपीएल टीमनं खरेदी केलं नव्हतं.

First published:
top videos

    Tags: Australia, Mumbai Indians