मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL : …म्हणून महेंद्रसिंह धोनीला RCB नं खरेदी केलं नाही!

IPL : …म्हणून महेंद्रसिंह धोनीला RCB नं खरेदी केलं नाही!

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे घट्ट समीकरण आहे. धोनीला पहिल्या आयपीएलपूर्वी (IPL 2008) चेन्नईनं खरेदी केलं.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे घट्ट समीकरण आहे. धोनीला पहिल्या आयपीएलपूर्वी (IPL 2008) चेन्नईनं खरेदी केलं.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे घट्ट समीकरण आहे. धोनीला पहिल्या आयपीएलपूर्वी (IPL 2008) चेन्नईनं खरेदी केलं.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 25 जानेवारी : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे घट्ट समीकरण आहे. धोनीला पहिल्या आयपीएलपूर्वी (IPL 2008) चेन्नईनं खरेदी केलं. त्यानंतर आजपर्यंत तोच सीएसकेचा कॅप्टन आहे. चेन्नईला तीन विजेतेपदं मिळवून देण्यात धोनीच्या कॅप्टनसीचा मोठा वाटा आहे. 2008 पूर्वीच्या ऑक्शनमध्ये चेन्नईनं धोनीला 1.5 मिलियन डॉलर (9.5 कोटी) रुपयांना खरेदी केलं होतं. धोनीला खरेदी करण्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि सीएसके (CSK) मध्ये चुरस होती. यामध्ये अखेर सीएसकेनं बाजी मारली. RCB नं देखील लावली होती बोली 2008 ते 2018 या काळात आयपीएल स्पर्धेचे ऑक्शनर म्हणून काम करणाऱ्या रिचर्ड मॅडली यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) देखील धोनीला खरेदी करण्यासाठी उत्सुक होती. RCB नं धोनीसाठी बोली देखील लावली. पण, त्यांनी फार मोठी बोली लावली नाही. त्यामुळे त्यांना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी कॅप्टनची सेवा मिळाली नाही. “आरसीबीनं 2008 साली धोनीसाठी बोली लावली होती. पण, ती बोली कमी होती. माझ्या मते आता त्यांना त्याचा पश्चाताप होत असेल’’, असं मत मत मॅडली यांनी व्यक्त केलं. आरसीबीचे माजी अधिकारी चारु शर्मा (Charu Sharma) यांनी देखील मागच्या वर्षी आरसीबीनं धोनीला का घेतलं नाही, याचा खुलासा केला होता. “क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका माणसाचा खेळ (वन मॅन शो) नाही. धोनी अपयशी झाला असता किंवा शून्यावर आऊट झाला असता तर त्याला इतके पैसे देऊन का खरेदी केलं? असा प्रश्न चेन्नईच्या फॅन्सनी विचारला असता,’’ असं मत चारु शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. RCB नं राहुल द्रविडला आयकॉन खेळाडू म्हणून निवडलं होतं. धोनीला खरेदी न करण्याचं हे देखील मुख्य कारण होतं. नियामानुसार आयकॉन खेळाडूला सामान्य खेळाडूंपेक्षा दहा टक्के रक्कम जास्त द्यावी लागणार होती. कदाचित याच कारणामुळे मुंबई इंडियन्सनं देखील धोनीच्या खरेदी प्रक्रियेतून माघार घेतली होती. धोनीला खरेदी करण्याचा निर्णय CSK साठी मोठा फायदेशीर ठरला. धोनीनं CSK ची 197 मॅचमध्ये कॅप्टनसी केली आहे. त्यामध्ये 119 मॅच जिंकल्या आहेत. चेन्नईनं आजवर 3 वेळा विजेतेपद पटाकवलं आहे. तर 11 पैकी 10 वेळा आयपीएल स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे.
First published:

Tags: Chennai, MS Dhoni, RCB

पुढील बातम्या