Home /News /sport /

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या वडिलांचं निधन, ब्रेन हॅमरेजशी झुंज अपयशी

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या वडिलांचं निधन, ब्रेन हॅमरेजशी झुंज अपयशी

टीम इंडियाचा माजी विकेट किपर पार्थिव पटेलच्या वडिलांचं निधन (Parthiv Patel father passed away) झालं आहे. पार्थिवनं ट्विट करत याची माहिती दिली आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी विकेट किपर पार्थिव पटेलच्या वडिलांचं निधन (Former Indian cricketer Parthiv Patel father passed away) झालं आहे. पार्थिवनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. पार्थिवचे वडिल अजयभाई पटेल यांना दोन वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपाासून त्यांची मृत्यूशी झूंज सुरू होती. ही झूंज अखेर अपयशी ठरली. 'मला हे कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, माझे वडील अजयभाई बिपिनचंद्र पटेल हे 26 सप्टेंबर रोजी आपल्याला सोडून गेले आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी आम्ही विनंती करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम नम: शिवाय' असं ट्विट करत पार्थिवनं याबाबतची माहिती दिली आहे. 'पार्थिव पटेलनं 2019 साली एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली होती. तेव्हा तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा सदस्य होता. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर मोबाईल चेक करत असताना वडिलांच्या काळजीनं आपल्याला सतत भीत वाटत असे. वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर आपण दहा दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, घरीही गेलो नव्हतो,' असं त्यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या