रोहित शर्मा-धोनीसोबत खेळलेल्या खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

रोहित शर्मा-धोनीसोबत खेळलेल्या खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

रोहित शर्मा आणि एम एस धोनी यांच्यासोबत क्रिकेट खेळणाऱ्या आणखी एका क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा माजी फास्ट पॉलर यो महेश (Yo Mahesh) याने क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : रोहित शर्मा आणि एम एस धोनी यांच्यासोबत क्रिकेट खेळणाऱ्या आणखी एका क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा माजी फास्ट पॉलर यो महेश (Yo Mahesh) याने क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. आज 33 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या यो महेश याने मागच्या 14 वर्षात 50 प्रथम श्रेणी, 61 लिस्ट ए आणि 46 टी-20 मॅच खेळल्या. 2006 सालच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये यो महेश भारतीय टीममध्ये होता, तसंच तो आयपीएलमध्ये चेन्नई आणि दिल्लीकडूनही खेळला. महेशने त्याची शेवटची मॅच तामीळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये ऑगस्ट 2019 साली खेळली.

कारकिर्दीमध्ये दुखापतीमुळे हैराण राहिलेल्या यो महेशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 108 विकेट, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 60 आणि टी-20 मॅचमध्ये 52 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये खेळलेल्या 18 मॅचमध्ये त्याने 21 विकेट मिळवल्या.

निवृत्तीची घोषणा करताना यो महेश याने बीसीसीआय (BCCI) चे धन्यवाद दिले. 'मला अंडर-19 आणि भारत-ए साठी खेळण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे धन्यवाद. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या कारकिर्दीतली ही सगळ्यात चांगली वेळ होती आणि याचा मला अभिमान आहे,' असं यो महेश म्हणाला.

तामीळनाडूचा फास्ट बॉलर असलेल्या यो महेशला संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींनी त्रास दिला. लंडनमध्ये गुडघ्याचं ऑपरेशन केल्यानंतर 2017 साली पाच वर्षांनंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतकांसह त्याच्या नावावर 1,119 रन आहेत. दुखापतीनंतर यो महेशने मुंबईविरुद्ध 2017 साली नाबाद 103 रनची खेळी केली.

2006 वर्ल्ड कपच्या अंडर-19 टीममध्ये

यो महेशने त्याची प्रथम श्रेणी कारकिर्द बंगालविरुद्ध सुरू केली. यानंतर तो 2006 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अंडर-19 टीममध्ये होता. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत त्याची निवड झाली होती. भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. त्या स्पर्धेत यो महेश सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू होता. यो महेशने 6 मॅचमध्ये 11 विकेट घेतल्या होत्या, तर त्याच्यापेक्षा जास्त पियुष चावलाने 13 विकेट घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये चांगली सुरुवात

यो महेश आयपीएलच्या पहिल्या मोसमात (2008) सगळ्यात यशस्वी खेळाडूंपैकी एक होता. दिल्लीकडून खेळताना त्याने सर्वाधिक 16 विकेट घेतल्या होत्या. यानंतर चेन्नईसाठी त्याने 5 मॅच खेळल्या आणि तीन विकेट घेतल्या.

Published by: Shreyas
First published: December 21, 2020, 10:26 AM IST
Tags:

ताज्या बातम्या