मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धक्कादायक! टीम इंडियाच्या माजी कॅप्टनचं वयाच्या 29 व्या वर्षी निधन

धक्कादायक! टीम इंडियाच्या माजी कॅप्टनचं वयाच्या 29 व्या वर्षी निधन

भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी आहे. टीम इंडियाच्या अंडर 19 टीमच्या माजी कॅप्टनचं वयाच्या 29 व्या वर्षी Cardiac Arrest मुळे निधन झालं आहे.

भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी आहे. टीम इंडियाच्या अंडर 19 टीमच्या माजी कॅप्टनचं वयाच्या 29 व्या वर्षी Cardiac Arrest मुळे निधन झालं आहे.

भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी आहे. टीम इंडियाच्या अंडर 19 टीमच्या माजी कॅप्टनचं वयाच्या 29 व्या वर्षी Cardiac Arrest मुळे निधन झालं आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी आहे. टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा माजी कॅप्टन (Former India Under 19 captain) आणि सौराष्ट्राचा खेळाडू अवी बरोत (Avi Barot) याचं वयाच्या 29 व्या वर्षी Cardiac Arrest  मुळे निधन झालं आहे. बरोत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रासह गुजरात आणि हरयाणा या टीमचंही प्रतिनिधित्व केलं होतं. 2019-20 साली रणजी स्पर्धेचं विजेतेपद मिळवणाऱ्या सौराष्ट्राच्या टीमचा तो सदस्य होता.

बरोत 2011 साली टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा सदस्य होता. त्यानं 38 फर्स्ट क्लास, 38 लिस्ट A आणि 20 टी20 मॅच खेळल्या. विकेट  किपर बॅटर असलेल्या बरोतनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1547, लिस्ट A मध्ये 1030 तर टी20 क्रिकेटमध्ये 717 रन काढले होते.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (SCA) अध्यक्ष जयदेव शहा यांनी बरोतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'अवीच्या जाण्याची बातमी ही अतिशय धक्कादायक आहे. तो एक चांगला खेळाडू होता. तसंच त्याचं क्रिकेटिंग स्कीलही उत्तम होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं अतिशय चांगली कामगिरी केली होती.' अशी भावना शहा यांनी व्यक्त केली आहे.

मोठी बातमी! राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच, 'द वॉल'नं केला BCCI चा प्रस्ताव मान्य

बरोतनं गेल्या काही सिझनमध्ये चांगली कामगिरी केली होती. 2020-21 च्या सिझनमधील विजय हजारे आणि मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो सौराष्ट्राच्या टीमचा सदस्य होता. त्यानं मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोव्या विरुद्ध शतक झळकावले होते. त्या मॅचमध्ये त्यानं फक्त 53 बॉलमध्ये 122 रन काढले होते. यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता.

First published:

Tags: Cricket news, Team india