• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • मोठी बातमी! राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच, 'द वॉल'नं केला BCCI चा प्रस्ताव मान्य

मोठी बातमी! राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच, 'द वॉल'नं केला BCCI चा प्रस्ताव मान्य

आयपीएल स्पर्धेची फायनल (IPL 2021 Final) संपताच भारतीय क्रिकेटमधील एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul Dravid) अखेर हेड कोच होण्यासाठी मान्यता दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेची फायनल (IPL 2021 Final) संपताच  भारतीय क्रिकेटमधील एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul Dravid) अखेर हेड कोच होण्यासाठी मान्यता दिली आहे. रवी शास्त्रींचा वारसदार म्हणून द्रविडचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती.  आयपीएल फायनलच्या दरम्यान द्रविडनं हा प्रस्ताव मान्य केला आहे. द्रविडसोबत सुरूवातीला 2 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, 'राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा हेड कोच होईल. तो लवकरच नॅशनल क्रिकेट अकादमीच्या (NCA) संचालक पदाचा राजीनामा देणार आहे.'याबाबत बीसीसीआयनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अखेर द्रविड कोच होण्यासाठी तयार झाला आहे. द्रविडला वेतन म्हणून 10 कोटी रुपये मिळणार आहेत. या रिपोर्टनुसार विक्रम राठोड (Vikram Rathour) बॅटींग कोच म्हणून यापूढेही कायम राहील. तर मुंबईकर पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) बॉलिंग कोच म्हणून भरत अरुण यांची जागा घेणार आहे. नव्या फिल्डिंग कोचबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबईचा माजी फास्ट बॉलर असलेला पारस म्हांब्रे यानं NCA, इंडिया A आणि अंडर 19 टीममध्ये द्रविड सोबत बॉलिंग कोच म्हणून काम केलेलं आहे. टीम इंडियाच्या युवा टीमनं श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्याच्या वेळी देखील द्रविड आणि म्हांब्रे जोडी सोबत होती. भारत-पाकिस्तान क्रिकेटसाठी सौरव गांगुलीचा मोठं पाऊल उचलण्याचा प्रयत्न, पण... यापूर्वी आलेल्या वृत्तानुसार टी20 वर्ल्ड कपनंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यापूरता राहुल द्रविड हेड कोच असेल असं मानलं जात होतं. पण बीसीसीआय द्रविडशिवाय अन्य कोणत्याही नावाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपत आहे. त्यांचा उत्तराधिकारी हा भारतीयच असेल, असं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: