• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : पाकिस्तानला मिळणार नवा कोच, 'या' दिग्गज खेळाडूचं नाव आघाडीवर

T20 World Cup : पाकिस्तानला मिळणार नवा कोच, 'या' दिग्गज खेळाडूचं नाव आघाडीवर

गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (PCB) आगामी टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) हे प्रमुख आव्हान आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑक्टोबर : गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (PCB) आगामी टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) हे प्रमुख आव्हान आहे. या वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा झाल्यानंतर काही तासांंमध्ये पाकिस्तान टीमचा हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर या वर्ल्ड कपसाठी नवा कोच निवडण्याचं आव्हान पीसीबीसमोर आहे. पाकिस्तान टीमच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी माजी ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताकचं aqlain Mushtaq) नाव आघाडीवर आहे. क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्त झाल्यानंतर सकलेन सक्रीय कोच बनला आहे. त्यानं अनेक टीमला प्रशिक्षण दिलं आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या टीमचा स्पिन बॉलिंग कोच आणि सल्लागार म्हणूनही त्यानं काम केलं आहे. आता आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी त्याच्याकडं पाकिस्तान टीमची जबाबदारी देण्याचा पीसीबीचा विचार आहे. पाकिस्तानच्या मीडियानं याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं एक मोठा रिपोर्ट सादर केली आहे. या रिपोर्टला मान्यता मिळाल्यानंतर पीसीबी अध्यक्ष रमिझ राजा याबाबतची अधिकृत घोषणा करतील. ऑस्ट्रेलियाचा माजी बॅट्समन मॅथ्यू हेडन याची पाकिस्तान टीमचा बॅटींग सल्लागार तर दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर वर्नोन फिनलँडर याची बॉलिंग सल्लागार म्हणून यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली पाकिस्तानच्या सर्वोत्तम बॉलरमध्ये मुश्ताकचा समावेश होतो. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 208 तर वन-डे क्रिकेटमध्ये 288 विकेट्स आहेत. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 833 विकेट्स आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: