सिडनी, 5 मे: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल
(Stuart Macgill) याच्या अपहराणाप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मॅकगिलचं सिडनीमधील राहत्या घरातून मागच्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं. खंडणीच्या प्रकरणातून 14 एप्रिल रोजी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.
या प्रकरणात मिळालेल्या महितीनुसार मॅकगिल यांना घरातून काही जणांनी अपहरण केलं आणि त्याला जबरदस्तीनं कारमध्ये बसवून दक्षिण पश्चिम ऑस्ट्रेलियातील एका शहरात नेण्यात आले. त्यानंतर त्याचे ठिकाण बदलण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन सुटका केली.
मॅकगिलच्या अपहरणाची बातमी 20 एप्रिल रोजी सार्वजनिक झाली, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिली आहे. यानंतर सिडनी पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. या सर्वांची नावं अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र त्यांचं वय 27, 29, 42 आणि 46 याच्या जवळ असल्याची माहिती आहे. या सर्वांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.
IPL 2021: यशस्वी जयस्वालला मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं खास गिफ्ट, पाहा Photo
स्टुअर्ट मॅकगिल ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर आहे. त्यानं 1998 साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 44 टेस्टमध्ये 208 विकेट्स घेतल्या. तो 2008 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. मॅकगिल कायम शेन वॉर्नच्या प्रभावात खेळला. जो त्या काळातील सर्वश्रेष्ठ लेग स्पिनर होता. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत शेन वॉर्न सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.