मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि IPL कॉमेंटेटरला 2 महिन्यांत दुसऱ्यांदा अटक

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि IPL कॉमेंटेटरला 2 महिन्यांत दुसऱ्यांदा अटक

ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूला दोन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा अटक करण्यात (Former Australia Cricketer Arrested) आली आहे. यापूर्वी त्याला 20 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

मुंबई, 15 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल स्लॅटरला (Michael Slater) घरगुती हिंसाचाराप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. आता पुन्हा एकदा या प्रकरणात कोर्टाचा आदेश भंग केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. स्लॅटरने आयपीएल स्पर्धेत (IPL) कॉमेंट्री देखील केली आहे.

काय आहे प्रकरण?

न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्लॅटरला बुधवारी पहाटे  4 वाजता अटक करण्यात आली आहे. स्लॅटरवर AVO (Apprehended Violence Order ) मधील निर्धारित नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा तसेच याबाबत कोर्टाने दिलेले आदेश न पाळल्याचा आरोप आहे. स्लॅटरला सिडनीमधील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथे त्याला जामीन फेटाळण्यात आला.

यापूर्वी स्लॅटरला 20 ऑक्टोबर रोजी एका घरगुती हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. मायकल स्लॅटर हा ऑस्ट्रेलियाचा यशस्वी ओपनिंग बॅटर आहे. त्यानं 2004 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जवळपास एक दशक तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या काळात त्यानं 74 टेस्टमध्ये 42.83 च्या सरासरीनं 5312 रन काढले. तर 42 वन-डेमध्ये 24.07 च्या सरासरीनं 987 रन केले आहेत.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेनं दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला दिली Good News

स्लॅटरचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्यानं 216 मॅचमध्ये 40.85 च्या सरासरीनं 14192 रन केले. तर 135 ए श्रेणीच्या मॅचमध्ये 26.52 च्या सरासरीनं 3395 रन काढले. 1993 साली पदार्पण करणाऱ्या स्लेटरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटची टेस्ट 2001 साली खेळली.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket, Crime