मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

World Cup विजेत्या कॅप्टननं फेटाळली टीम इंडियाचा कोच होण्याची ऑफर

World Cup विजेत्या कॅप्टननं फेटाळली टीम इंडियाचा कोच होण्याची ऑफर

रवी शास्त्रींनंतर (Ravi Shastri) टीम इंडियाचा हेड कोच कोण होणार हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला प्रश्न आहे. बीसीसीआयनं याबाबत वर्ल्ड कप विजेत्या टीमच्या कॅप्टनशीही संपर्क साधला होता.

    मुंबई, 17 ऑक्टोबर: रवी शास्त्रींनंतर (Ravi Shastri) टीम इंडियाचा हेड कोच कोण होणार हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला प्रश्न आहे. माजी कॅप्टन राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव यासाठी फायनल झाल्याचं वृत्त आता प्रसिद्ध झालं आहे. पण द्रविड या पदासाठी तयार होण्यापूर्वी बीसीसीआयनं अन्य नावांचीही चाचपणी केली होती. त्यामध्ये वर्ल्ड कप विजेत्या टीमच्या कॅप्टनचाही समावेश होता. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) बीसीसीआयनं टीम इंडियाचा हेड कोच होण्याची  ऑफर केली होती. पण, पॉन्टिंगनं ही ऑफर नाकारली, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे. पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2003 आणि 2007 साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या आयपीएल टीमचा सदस्य आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीनं यंदा प्ले ऑफ मध्ये धडक मारली होती. पॉन्टिंगनं नकार देण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही. रवी शास्त्रींचा वारसदार म्हणून टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव आता नक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. आयपीएल फायनलच्या दरम्यान द्रविडनं हा प्रस्ताव मान्य केला आहे. द्रविडसोबत सुरूवातीला 2 वर्षांचा करार करण्यात येणार आहे, असं या सूत्रांनी सांगितलं. राहुल द्रविडनं यापूर्वी टीम इंडियाचा हेड कोच होण्यापेक्षा बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक म्हणून काम करण्यास रस असल्याचं सांगितलं होतं. पण, द्रविडला अपेक्षित असलेला पगार एनसीए संचालक म्हणून मिळणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्याला हव्या त्या पगारात टीम इंडियासोबत राहण्यासाठी हेड कोच हे एकच पद शिल्लक होते. Team India चा प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडला मिळणार एवढं मानधन द्रविडच्या नियुक्तीबाबत कोहलीचा खुलासा सध्या यूएईमध्ये टी20 वर्ल्ड कपची तयारी करत असलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) द्रविडच्या नियुक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 'कोचच्या नियुक्तीबाबत काय चालू आहे, हे मला माहिती नाही. आम्ही यावर चर्चा केलेली नाही. आमचं लक्ष्यं वर्ल्ड कप जिंकणं आहे,' असा खुलासा कोहलीनं केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या