बुमराहपासून जडेजापर्यंत भारताच्या 5 स्टार क्रिकेटपटूंचा BIRTHDAY

बुमराहपासून जडेजापर्यंत भारताच्या 5 स्टार क्रिकेटपटूंचा BIRTHDAY

डिसेंबरचा महिना भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. 5 तारखेला शिखर धवनने त्याचा वाढदिवस साजरा केला. यानंतर 12 डिसेंबरला युवराज सिंगचा वाढदिवस आहे. तर आज म्हणजेच 6 डिसेंबरला भारताच्या 5 दिग्गज क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे.

  • Share this:

सिडनी, 6 डिसेंबर : डिसेंबरचा महिना भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. 5 तारखेला शिखर धवनने त्याचा वाढदिवस साजरा केला. यानंतर 12 डिसेंबरला युवराज सिंगचा वाढदिवस आहे. तर आज म्हणजेच 6 डिसेंबरला भारताच्या 5 दिग्गज क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे. यातले 3 क्रिकेटपटू सध्या भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह, ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर यांचा आज वाढदिवस आहे. यापैकी फक्त श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी टी-20 मॅच खेळत आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे, तर जडेजाला दुखापत झाल्यामुळे तोदेखील सामन्याला मुकला आहे.

या तीन खेळाडूंशिवाय भारताकडून टेस्टमध्ये त्रिशतक करणारा करुण नायर आणि भारताला 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा माजी फास्ट बॉलर आरपी सिंग याचाही आज वाढदिवस आहे.

रविंद्र जडेजा

1988 साली जन्मलेल्या रविंद्र जडेजाने टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत 213 विकेट घेतल्या आहेत, तर वनडेमध्ये जडेजाने दोन हजारपेक्षा जास्त रन आणि 150 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. या खास रेकॉर्डमध्ये सचिन आणि कपिल देव यांचाही समावेश आहे.

जसप्रीत बुमराह

1993 साली जन्मलेल्या जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधला धमाकेदार बॉलर आहे. टेस्टमध्ये बुमराहने 14 मॅचमध्ये 68 विकेट घेतल्या आहेत. तर वनडेमध्ये बुमराहचा इकोनॉमी रेट 4.65 आहे.

श्रेयस अय्यर

1994 साली जन्मलेल्या श्रेयस अय्यरची वनडे क्रिकेटमधली सरासरी 44.83 आहे. 19 इनिंगमध्ये अय्यरने 807 रन केले आहेत. वनडेमध्ये अय्यरच्या नावावर एक शतक आणि 8 अर्धशतकं आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये अय्यरला मनिष पांडेऐवजी संधी देण्यात आली. मनिष पांडेच्या कोपराला दुखापत झाल्यामुळे तो या मॅचमध्ये खेळू शकला नाही.

Published by: Shreyas
First published: December 6, 2020, 5:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या