रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा विराट करत होता विचार, पण 'या' कारणामुळे बदलला निर्णय

रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा विराट करत होता विचार, पण 'या' कारणामुळे बदलला निर्णय

तिसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन झाल्याने त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

  • Share this:

मेलबर्न, २७ डिसेंबर २०१८- मेलबर्न कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत विराटने फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल या नवीन जोडीला खेळायची संधी दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, रोहितला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्याचा तो विचार करत होता. मात्र त्यानंतर विराटने हनुमाला सलामीवीर म्हणून पाठवण्याचा निणर्य घेतला.

याबद्दल स्पष्टीकरण देताना विराट म्हणाला की, ‘रोहित सलामीवीर म्हणून जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढीच चांगली फलंदाजी तो सहाव्या स्थानावरही करतो. याच कारणामुळे आम्ही त्याला सहाव्या स्थानावर ठेवण्याचा निर्णय घेतला.’गेल्या सामन्यात टीम इंडियाच्या लोअर ऑर्डरने सपशेल निराशा केली होती. दुखापतीमुळे रोहित दुसरा सामना खेळू शकला नव्हता. मात्र आता तिसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन झाल्याने त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

कोहलीने हनुमा विहारीला सलामीसाठी पाठवण्याचं मुख्य कारण म्हणजे विहारी नवीन चेंडूला जुना करण्यात सक्षम आहे. हनुमा विराटच्या अपेक्षांवर खरा उतरला. हनुमाबद्दल बोलताना विराट म्हणाला की, ‘हनुमाने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत नंबर ३ वर फलंदाजी करत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या याच वैशिष्ट्यांमुळे आम्ही त्याला सलामीची जबाबदारी दिली.’ सध्या टीम इंडियाने पाच गडी गमावत ३७ धावांवर खेळत आहे. रोहित शर्मा ३५ धावांवर आणि ऋषभ पंत ३ धावांवर खेळत आहे.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतासाठी हनुमा विहारी आणि मयंक अग्रवालने सलामीवीर जोडीची जबाबदारी सांभाळली. सलामीवीर जोडी म्हणून दोघांचा हा पहिलाच सामना होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असं करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. मयंक आणि विहारीने भारताला ४० धावांची चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र पॅट कमिन्सने हनुमा विहारीला (८) एरॉन फिंचकरवी झेल बाद केले.

'बॉक्सिंग डे'ने मेलबर्न क्रिकेट मैदानात सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १ -१ अशा बरोबरीत आहेत. या सामन्यातील विजयामुळे फक्त मालिकेत स्थान घट्ट होणार असं नाही तर २०१८ वर्षाचा शेवट विजयाने केला ही मानसिकता खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी उपयुक्त ठरेल. एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने सामना जिंकला तर पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने जसंच्या तसं उत्तर देत मालिकेत आपलं अस्तित्व टिकवून धरलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत.

‘लेडी लक’ने बदललं नशीब, पहिल्याच सामन्यात ठोकले अर्धशतक

First published: December 27, 2018, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading