मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुंबई-पुण्यात T20 वर्ल्ड कपसाठी BCCI आग्रही, पण शिवसेना काय भूमिका घेणार?, कोरोना नाही तर 'हे' आहे कारण

मुंबई-पुण्यात T20 वर्ल्ड कपसाठी BCCI आग्रही, पण शिवसेना काय भूमिका घेणार?, कोरोना नाही तर 'हे' आहे कारण

टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मुंबई आणि पुण्यात घेण्यासाठी बीसीसीआय (BCCI) आग्रही आहे. मात्र महाराष्ट्रात वर्ल्ड कप झाल्यास शिवसेना काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 मे : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) शनिवारी झालेल्या बैठकीत आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) उर्वरित सामने आणि टी 20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2021) आयोजन हे विषय होते. यापैकी आयपीएल स्पर्धेचा विषय आता निकाली लागला आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने हे युएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयच्या बैठकीत या विषयावर एकमताने निर्णय झाला.

टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत आणखी एक महिन्याची मुदत आयसीसीला मागण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. आयसीसीची बैठक 1 जून रोजी होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) हे उपस्थित राहणार असून ते बीसीसीआयच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आयसीसीला देतील. टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 1 जुलैपर्यंत बीसीसीआय मुदत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना काय भूमिका घेणार?

टी वर्ल्ड कप भारतामध्ये झाल्यास महाराष्ट्रात घेण्याचा सर्वोत्तम पर्याय बीसीसीआयसमोर आहे. मुंबईतील तीन स्टेडियम आणि पुण्यात वर्ल्ड कपचे सामने होतील. या ठिकाणी सामने झाल्यास खेळाडूंना विमान प्रवासाची गरज लागणार नाही. पण या आयोजनात कोरोनापेक्षा आणखी एक अडचण बीसीसीआयसमोर आहे.

पाकिस्तानचे कोणतेही सामने मुंबई किंवा महाराष्ट्रात होऊ न देण्याची शिवसेनेची भूमिका आहे.  बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना ते या भूमिकेसाठी शेवटपर्यंत आग्रही होते. मुंबईत 1991 साली होणारी पाकिस्तानची मॅच रद्द करण्यासाठी तेव्हा शिवसेनेत असलेले नेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी वानखेडेची स्टेडियमची खेळपट्टी उखडून टाकली होती. शिवसेनेचे विरोधामुळे गेल्या तीन दशकात महाराष्ट्रात पाकिस्तानची एकही मॅच झालेली नाही.

शुभमन गिलनं केला रिलेशनशिपचा खुलासा, सारा तेंडुलकरसोबत होती अफेयरची चर्चा

टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम भारतामध्ये येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाकिस्तानचे सामने खेळवण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याची बीसीसीआयला चिंता आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket, Shivsena, T20 world cup