धोकादायक शॉट रोखण्याचा प्रयत्न, पाहा क्रिकेटपटूची काय झाली अवस्था

धोकादायक शॉट रोखण्याचा प्रयत्न, पाहा क्रिकेटपटूची काय झाली अवस्था

पाकिस्तान सुपर लीगमध्ये फलंदाजाने टोलावलेल्या चेंडूने गोलंदाज जखमी झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : क्रिकेटच्या मैदानात अपवादात्मक स्थितीत दुर्घटना घडतात. त्यातही एखाद्यावेळी वेगवान गोलंदाजाचा चेंडू लागून फलंदाज जखमी होऊ शकतात. गोलंदाजांना मात्र असा चेंडू लागण्याची शक्यता कमीच असते. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फवाद अहमदसाठी पाकिस्तान सुपर लीगमध्ये बुधवारचा दिवस चांगला नव्हता. गोलंदाजी करताना फलंदाजाने टोलावलेला चेंडू त्याला इतक्या जोराने लागला की त्याच्या चेहऱ्यावर सर्जरी करण्याची वेळ आली.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळणाऱ्या फवादला इनाम-उल हकने मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्हने जखमी केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या व्हिडीओत फवाद स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण शेवटी चेंडू त्याच्या चेहऱ्यावर आदळल्याचे दिसते.

चेहऱ्यावर चेंडू लागल्यानंतर लगेच फवादला रुग्णालयाच दाखल करण्यात आली. यात त्याच्या जबड्याला दुखापत झाल्याने सर्जरी करावी लागली. आता त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. असे असले तरीही तो लवकरच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्याने स्वत: अंतिम सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

VIDEO : न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार, जीव मुठीत घेऊन धावले बांगलादेशचे क्रिकेटर

First published: March 15, 2019, 3:57 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading