मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes: इंग्लंडचा फास्ट बॉलर बनला ऑफ स्पिनर, वाचा इंग्लिश टीमवर का आली ही वेळ!

Ashes: इंग्लंडचा फास्ट बॉलर बनला ऑफ स्पिनर, वाचा इंग्लिश टीमवर का आली ही वेळ!

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅडलेड टेस्टचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा फास्ट बॉलरने ऑफ स्पिन बॉलिंग करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅडलेड टेस्टचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा फास्ट बॉलरने ऑफ स्पिन बॉलिंग करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅडलेड टेस्टचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा फास्ट बॉलरने ऑफ स्पिन बॉलिंग करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

अ‍ॅडलेड, 19 डिसेंबर : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅडलेड टेस्टचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियानं 3 विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियानं डिनपर्यंत 4 आऊट 137 रन केले होते. या सेशनमध्ये इंग्लंडच्या फास्ट बॉलरनं चक्क ऑफ स्पिन बॉलिंग केली. 140 किलो मीटरच्या वेगानं बॉलिंग करणाऱ्या या फास्ट बॉलरनं ऑफ स्पिन बॉलिंग करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याने ऑफ स्पिन बॉलिंग केली. रॉबिन्सननं पहिल्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा या टेस्टमधील कॅप्टन स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) फास्ट बॉलिंगवर आऊट केले. त्यानंतर काही ओव्हर्स टाकल्यानंतर त्यानं ऑफ स्पिन बॉलिंग केली.

काय आहे कारण?

इंग्लंडची टीम या टेस्टमध्ये चार फास्ट बॉलर्ससह उतरली आहे. तसंच या टीममध्ये स्पिन बॉलिंग करेल असा ऑल राऊंडर देखील नाही. इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root)  स्पिनर म्हणून पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग केली. पण, चौथ्या दिवशी जो रूट जखमी झाल्यानं जवळपास दीड तास मैदानाच्या बाहेर होता. त्यामुळे ओव्हर रेट वाढवण्यासाठी ओली रॉबिन्सनला ऑफ स्पिन बॉलिंग करावी लागली.

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिली इनिंग 9 आऊट 473 रनवर घोषित केली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या इनिंगमध्ये मार्नस लाबुशेननं सर्वाधिक 103 रन काढले. त्याला उत्तर देताना इंग्लंडची पहिली इनिंग 236 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडकडून कॅप्टन  जो रूट आणि डेव्हिड मलान यांनी अर्धशतक झळकावले, पण अन्य बॅटर्सनी निराशा केली.

Ashes : कोरोनाची धास्ती! 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' चे खेळाडूंवर कडक निर्बंध

ऑस्ट्रेलियाना पहिल्या इनिंगमध्ये 237 रनची आघाडी मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी फॉलो ऑन न  लादण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये लाबूशेन आणि ट्रेव्हिड हेड यांनी अर्धशतक झळकावत टीमचा स्कोअर 175 रनच्या पुढे नेला आहे. ऑस्ट्रेलियाकडे आता 400 पेक्षा जास्त रनची आघाडी असून त्यांनी या टेस्टवर घट्ट पकड मिळवली आहे. या सीरिजमध्ये ब्रिस्बेनमध्ये झालेली पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनं जिंकत सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

First published:
top videos

    Tags: Ashes, Australia, England