पावसामुळे खेळ थांबला: चाहते म्हणाले, पहिल्यांदाच वनडे मॅचची कसोटी झाली!

पावसामुळे खेळ थांबला: चाहते म्हणाले, पहिल्यांदाच वनडे मॅचची कसोटी झाली!

भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी काही मजेशीर पोस्ट केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जुलै: ICC Cricket World Cupमधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनचा सामना पावसामुळे पहिल्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या आहेत. मँचेस्टरमध्ये मंगळवार आणि आज (बुधवार) या दोन्ही दिवशी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पावसामुळे याआधी अनेक सामने रद्द झाले आहेत. यामुळे चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका देखील केली होती. सोशळ मीडियावर जगभरातील चाहत्यांनी आयसीसीचा समाचार घेतला होता. पावसामुळे तर अनेक संघांचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न देखील भंगले आहे. आता सेमीफायनल सारख्या बाद फेरीत देखील पावसाने खोडा घातल्याने क्रिकेट चाहते अधिकच नाराज झाले आहेत. भारतासारख्या देशात क्रिकेटच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. तेथे पावसामुळे सामना थांबल्याचा राग आयसीसीवर निघाला नाही तरच नवल. भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी काही मजेशीर पोस्ट केल्या आहेत.

SPECIAL REPORT : ही मुंबई नव्हे अमेरिका, ट्रम्प यांच्याही घरात शिरले पाणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 08:31 AM IST

ताज्या बातम्या