Home /News /sport /

फुटबॉलनंतर क्रिकेटच्या मैदानात दुर्घटना, फाफ ड्यू प्लेसिस गंभीर जखमी, LIVE VIDEO

फुटबॉलनंतर क्रिकेटच्या मैदानात दुर्घटना, फाफ ड्यू प्लेसिस गंभीर जखमी, LIVE VIDEO

युरो कप फुटबॉल स्पर्धेत (Euro 2020) डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला. त्यापाठोपाठ पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) दुर्घटना घडली आहे.

    मुंबई, 13 जून : युरो कप फुटबॉल स्पर्धेत (Euro 2020)  डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला.  त्यापाठोपाठ पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) दुर्घटना घडली आहे. महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) खास मित्र आणि त्याचा चेन्नई टीममधील सहकारी फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis) शनिवारी जखमी झाला. ड्यू प्लेसिस पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या टीमकडून खेळत आहे. शनिवारी त्यांची मॅच पेशावर विरुद्ध होती. पेशावरच्या बॅटींगच्या दरम्यान सातव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर तो फिल्डिंग करताना जखमी झाला. डेव्हिड मिलरने लाँग ऑनला मारलेला बॉल पकडण्यासाठी फाफाने डाईव्ह मारली. त्यावेळी तो बॉल पकडण्यासाठी आलेल्या हसनैनचा पाय त्याच्या डोक्याला लागला. त्यानंतर काही वेळ फाफ मैदानावरच पडून होता. त्यानंतर त्याला बाहेर नेण्यात आले. नव्या नियमानुसार खेळाडूच्या डोक्याला जखम झाली तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात येते. फाफचा कनकशन सबस्टिट्यूट म्हणून सॅम अय्यब मैदनात उतरला. पेशावरने पहिल्यांदा बॅटींग करताना 5 आऊट 197 रन केले. डेव्हिड मिलरने 46 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 73 रन काढले. कमरान अकमलने 59 रनची खेळी केली. EURO 2020: मैदानात कोसळलेल्या एरिक्सनसाठी कॅप्टन ठरला देवदूत! क्वेटाला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 136 रनवर ऑल आऊट झाली. पेशावरनं 61 रननं मोठा विजय मिळवला. फाफच्या मैदानात आलेल्या सॅम अय्यूबने 31 बॉलमध्ये 35 रन काढले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Pakistan

    पुढील बातम्या