Home /News /sport /

टीम इंडियाचा युवराज झाला बाबा! बाळाच्या जन्मानंतर सर्वांना केली खास विनंती

टीम इंडियाचा युवराज झाला बाबा! बाळाच्या जन्मानंतर सर्वांना केली खास विनंती

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंह बाबा (Yuvaraj Singh became father) झाला आहे. युवराजने स्वत: सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

    मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंह बाबा (Yuvaraj Singh became father) झाला आहे. युवराजने स्वत: सोशल मीडियावर त्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा युवराजनं ही माहिती सर्वांना सांगितली. 'सर्व फॅन्स, कुटुंबीय आणि मित्रांना सांगायला आनंद होत आहे की, आम्हाला आज देवानं मुलाचा आशीर्वाद दिला आहे.  आम्ही देवाचे यासाठी आभार मानतो. आमच्या खासगीपणाचा तुम्ही आदर कराल अशी आशा आहे. या जगात लहान बाळाचं स्वागत आहे. लव्ह, हेजल आणि युवराज' असे ट्विट युवराजने केले आहे. युवराज आणि हेजल किच (Hazel Keech) यांनी 12 नोव्हेंबर 2015 रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2016 रोजी दोघांनी लग्न केले. हेजलनं तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर तिने काही सिनेमात देखील काम केले. यामध्ये सलमान खानच्या बॉडीगार्डमधील सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेचा समावेश आहे. या सिनेमात तिनं करिना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. हेजलनं हिंदीसह तेलुगू आणि पंजाबी सिनेमात देखील काम केले आहे. त्याचबरोबर ती 'बिग बॉस सिझन 7' ची देखील सदस्य होती. 'बाप बाप होता है...', वडिलांनी शिखर धवनच्या कानाखालीच हाणली, पाहा VIDEO भारताच्या दिग्गज ऑल राऊंडरमध्ये असलेल्या युवराजने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने 40 टेस्ट 304 वन-डे, 58 टी20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. 2007 साली झालेला टी20 वर्ल्ड कप आणि 2011 साली झालेला वन-डे वर्ल्ड कप जिंकण्यात युवराजची भूमिका मोठी होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या