मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या रिकी पॉन्टिंगच्या सहकाऱ्याला अटक, वाचा काय आहे आरोप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या रिकी पॉन्टिंगच्या सहकाऱ्याला अटक, वाचा काय आहे आरोप

1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेट विश्वात मोठा दबदबा होता. या काळात क्रिकेटविश्व गाजणाऱ्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला (EX Australian Cricketer arrested) अटक करण्यात आली आहे.

1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेट विश्वात मोठा दबदबा होता. या काळात क्रिकेटविश्व गाजणाऱ्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला (EX Australian Cricketer arrested) अटक करण्यात आली आहे.

1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेट विश्वात मोठा दबदबा होता. या काळात क्रिकेटविश्व गाजणाऱ्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला (EX Australian Cricketer arrested) अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेट विश्वात मोठा दबदबा होता. टेस्ट आणि वन-डे या क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व होतं. या टीममध्ये अनेक मॅच विनर्स होते. त्यापैकी काही जण अजूनही क्रिकेट विश्वात सक्रीय आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) हे याचं प्रमुख उदाहरण. पॉन्टिंग सध्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या आयपीएल टीमचा हेडकोच आहे.

रिकी पॉन्टिंगचा जुना सहकारी आणि ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅटर मायकल स्लॅटरला (Ex cricketer Michael Slater arrested) सिडनीमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. स्लॅटरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप आहे. स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षांच्या स्लॅटरला अटक केलेल्या वृत्ताला न्यू साऊथ वेल्स (New South Wales) पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मंगळवार 12 ऑक्टोबर 2021 रोजी पोलिसांनी एका कथित घरगुती हिंसाचाराची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणाचा संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला. या तपासानंतर आज (बुधवार, 20 ऑक्टोबर) सकाळी स्लॅटरला अटक करण्यात आली आहे.

मायकल स्लॅटर हा ऑस्ट्रेलियाचा यशस्वी ओपनिंग बॅटर आहे. त्यानं 2004 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जवळपास एक दशक तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या काळात त्यानं 74 टेस्टमध्ये 42.83 च्या सरासरीनं 5312 रन काढले. तर 42 वन-डेमध्ये 24.07 च्या सरासरीनं 987 रन केले.

T20 World Cup: KKR चं नुकसान केल्यानंतर मॉर्गनची दुटप्पी भूमिका, इंग्लंडला लावणार वेगळा न्याय

स्लॅटरचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्यानं 216 मॅचमध्ये 40.85 च्या सरासरीनं 14192 रन केले. तर 135 ए श्रेणीच्या मॅचमध्ये 26.52 च्या सरासरीनं 3395 रन काढले. 1993 साली पदार्पण करणाऱ्या स्लेटरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटची टेस्ट 2001 साली खेळली.

First published:
top videos

    Tags: Australia, Cricket news