विचित्र गोलंदाजीने फलंदाजाची तारांबळ, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

विचित्र गोलंदाजीने फलंदाजाची तारांबळ, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

खराब गोलंदाजीवर फटकेबाजी करणं अपेक्षित असताना यूरोपीयन टी10 लीगमध्ये खराब फलंदाजीचा नमुनाही बघायला मिळाला.

  • Share this:

लंडन, 30 जुलै : भारताचा फिरकीपटू आर अश्विनने काही दिवसांपूर्वी तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यूरोपीयन टी10 क्रिकेट लीगमध्ये रोमानियन वंशाचा क्रिकेटपटू पावेल फ्लोरिनची गोलंदाजीची शैली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

लीगमध्ये क्लूज क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या फ्लोरिनने डेक्स क्रिकेट क्लबविरुद्ध खेळताना वेगळ्याच शैलीत गोलंदाजी केली. त्याचा व्हिडिओ पाहून कोणीही चक्रावून जाईल. सोमवारी झालेल्या सामन्यात फ्लोरिनने एक षटक टाकलं. यामध्ये त्याने वाइड चेंडूच सर्वाधिक टाकले. धीम्या गतीने टाकलेले चेंडू फलंदाजालासुद्धा खेळता आले नाही. त्याचीही चर्चा होत आहे. फ्लोरिनचा एकही चेंडू त्या फलंदाजाला चौकार किंवा षटकार मारता आला नाही.

पावेलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं की, त्यानं या सामन्यासाठी तब्बल 9 तास प्रवास केला. त्यानंतर तो मैदानात उतरला होता. पावेलनं क्लूज क्रिकेट क्लबकडून खेळताना सर्वाधिक नाबाद 34 धावांची खेळी केली.

याआधी भारताचा फिरकीपटू अश्विनचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. डिंडीगूल ड्रॅगन्सकडून गोलंदाजी करताना अश्विननं 4 ओव्हरमध्ये 16 धावा देत 3 विकेट घेतल्या. डिंडीगूल ड्रॅगन्स आणि मधुराई पँथर्सवर यांच्यात झालेल्या सामन्यात मधुराई पँथर्सवरला अखेरच्या षटकात 32 धावांची गरज असताना कर्णधार अश्विननं गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच चेंडूवर अभिषेक तन्वरला बाद केले. ओव्हरच्या अखेरच्या दोन चेंडूवर अश्विननं रहस्यमय शैलीत गोलंदाजी केली. हा चेंडू पाहून फलंदाज आणि अश्विनचे सहकारीही हैरान झाले. फलंदाज किरण आकाशनं चकीत झाला. त्यानं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं टोलवला. पण, त्याला झेलबाद होऊन माघारी परतावे लागले.

वाघा बॉर्डरवर जोर दाखवणारा पाक क्रिकेटपटू होणार भारताचा जावई

कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 30, 2019 07:00 PM IST

ताज्या बातम्या