Home /News /sport /

शेवटच्या बॉलवर दोन रन काढून मॅच टाय, विकेट कीपरने जे केलं ते पाहून धक्का बसेल

शेवटच्या बॉलवर दोन रन काढून मॅच टाय, विकेट कीपरने जे केलं ते पाहून धक्का बसेल

क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टी शक्य असतात, असं म्हणलं जातं. युरोपियन क्रिकेट सीरिज (European Cricket Series)च्या एका मॅचमध्ये याचाच अनुभव आला.

    मुंबई, 29 ऑक्टोबर : क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टी शक्य असतात, असं म्हणलं जातं. युरोपियन क्रिकेट सीरिज (European Cricket Series)च्या एका मॅचमध्ये याचाच अनुभव आला. क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल. विकेट कीपरच्या हातात बॉल असूनही विरोधी टीमने 2 रन काढले आणि मॅच टाय केली. धक्कादायक म्हणजे विकेट कीपर हा स्टम्पपासून काही इंच लांब होता, पण तरीही त्याला बॅट्समनला रन आऊट करता आलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युरोपियन क्रिकेट सीरिजदरम्यान पाकसिलोना क्रिकेट क्लबमध्ये बॅट्समननी काटालुन्या टायगर्स विरुद्ध ज्याप्रकारे मॅच टाय केली ते पाहून मैदानातले खेळाडूही हैराण झाले. शेवटच्या बॉलवर पाकसिलोना क्रिकेट क्लबला विजयासाठी 3 रनची गरज होती. काटालुन्याच्या बॉलरने टाकलेला शेवटचा बॉल बॅट्समनला बॅटला लावता आला नाही, त्यामुळे बॉल कीपरकडे गेला. पण बॅट्समन बाय रन काढण्यासाठी धावला. तेवढ्यात विकेट कीपर स्टम्पजवळ पोहोचला. त्यावेळी पाकसिलोनाचा बॅट्समन दुसरी रन काढण्यासाठी धावला. बॅट्समन दुसऱ्या रनसाठी धावल्यानंतर विकेट कीपरने समोर असलेल्या स्टम्पवर बॉल मारण्याऐवजी बॉलरकडे बॉल फेकला. यानंतर बॉलरला बॉल स्टम्पला मारता आला नाही, त्यामुळे पाकसिलोनाच्या बॅट्समननी दोन रन काढल्या आणि मॅच टाय झाली. असं झालं असलं तरी शेवटी काटाल्युना टायगर्स टीमचाच विजय झाला, कारण सुपर ओव्हरमध्ये त्यांनी पाकसिलोनाला पराभूत केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या