Home /News /sport /

IND vs ENG: आर. अश्विननं पहिल्या टेस्टपूर्वी केली खास रेकॉर्डची नोंद

IND vs ENG: आर. अश्विननं पहिल्या टेस्टपूर्वी केली खास रेकॉर्डची नोंद

टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) सरे (Surrey) या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्येच त्याने एका खास रेकॉर्डची नोंद केली आहे.

    लंडन, 12 जुलै: टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) सरे (Surrey) या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विननं पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली असली तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन आणि इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन रोरी बर्न्सनं अश्विनला दोन्ही बाजूनं बॉलिंग दिली. यावेळी त्याने एका रेकॉर्डची नोंद केली. गेल्या 11 वर्षात इनिंगमधील पहिली ओव्हर टाकाणारा अश्विन हा स्पिनर बनला आहे. यापूर्वी 2010 साली जतीन पटेलनं ही कामगिरी केली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (WTC Final) इंग्लंडमध्ये सराव न केल्याचा फटका टीम इंडियाला बसला होता. अश्विननं देखील पराभवानंतर ही बाब मान्य केली होती. ही चूक सुधारण्यासाठी तो आता कामाला लागला आहे. अश्विन खेळत असलेला हा सामना 'द ओव्हल'वर  होत आहे. याच मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट होणार आहे. त्यामुळे अश्विनला सरेकडून मिळालेल्या संधीचा टीम इंडियाला फायदा होणार आहे. द्रविडच्या ‘या’ खास माणसामुळे सुधारली टीम इंडियाची फिल्डिंग, इंग्लंड विरुद्ध दिसली जादू भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) टेस्ट सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) दुसरा सिझन सुरू होत आहे. त्याचबरोबर मागील काही इंग्लंड दौऱ्यात पराभव झाल्यानं टीम इंडियासाठी ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे. या सीरिजपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. अश्विननं या ब्रेकमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी सरे टीमबरोबर एका मॅचसाठी करार केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India vs england, R ashwin

    पुढील बातम्या