भारतात क्रिकेट परतणार, इंग्लंडची टीम दौऱ्यावर येणार!

भारतात क्रिकेट परतणार, इंग्लंडची टीम दौऱ्यावर येणार!

कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे ठप्प पडलेलं भारतीय क्रिकेट लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार असल्याचं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे ठप्प पडलेलं भारतीय क्रिकेट लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार असल्याचं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने सांगितलं आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येईल. या दौऱ्यात अहमदाबादमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच खेळवली जाईल, असं गांगुलीने सांगितलं. इंग्लंडला पुढच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये पाच टेस्ट आणि मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी भारताचा दौरा करायचा आहे.

कोलकाता प्रेस क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गांगुली बोलत होता. भारतातल्या कोरोना परिस्थितीमुळे हा दौरा युएईमध्ये होईल, असं सांगितलं जात होतं. यंदाच्या वर्षीची आयपीएल (IPL 2020) ही कोरोनामुळे युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. बीसीसीआय मात्र इंग्लंड दौरा भारतातच खेळवण्यासाठी कटिबद्ध आहे, यासाठी जैव सुरक्षित (बायो-बबल) चाही विचार केला जात आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

टेस्ट सीरिजसाठी अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता ही संभाव्या ठिकाणं आहेत, पण याबाबात अंतिम निर्णय झालेला नाही. आम्ही काही योजना बनवल्या आहेत, पण याबाबत निर्णय झालेला नाही. आमच्याकडे अजून 4 महिन्यांचा अवधी आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.

सध्या आमची प्राथमिकता ऑस्ट्रेलिया दौऱ्याला असल्याचं गांगुलीने सांगितलं. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या सीरिजसाठी येत्या आठवड्यात टीम इंडियाची निवड व्हायची शक्यता आहे. भारतामध्ये 1 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीच्या मोसमाला सुरुवात होणार असल्याचंही गांगुलीने स्पष्ट केलं.

Published by: Shreyas
First published: October 21, 2020, 10:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या