Home /News /sport /

VIDEO: क्रिकेटच्या मैदानात Euro चा फिव्हर, धोनीच्या सहकाऱ्यानं केलं 'फुटबॉल रन आऊट'

VIDEO: क्रिकेटच्या मैदानात Euro चा फिव्हर, धोनीच्या सहकाऱ्यानं केलं 'फुटबॉल रन आऊट'

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England vs Sri Lanka) यांच्यात कार्डिफमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं फुटबॉल कौशल्य पाहयला मिळालं.

    मुंबई, 25 जून: सध्या जगभर युरोपीयन फुटबॉल कप (Euro Cup 2020) स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेचे साखळी सामने संपले असून आता बाद फेरीत सामने होणार आहेत. इंग्लंडची टीम देखील या स्पर्धेच्या बाद फेरीत दाखल झाली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्येही  सध्या फुटबॉलचा फिव्हर रंगला आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England vs Sri Lanka) यांच्यात कार्डिफमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं फुटबॉल कौशल्य पाहयला मिळालं. श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीममधील सहकारी सॅम करन (Sam Curran) याचे फुटबॉल कौशल्य दिसले. करनने पायानेच स्टंपला बॉल मारत श्रीलंकेचा ओपनिंग बॅट्समन धुनष्का गुनतालिकाला आऊट केले. धनुष्कानं त्याचा जोडीदारा अविष्का फर्नांडोला वेगानं रन काढण्यासाठी कॉल केला होता. त्यावेळी करननं पायाने बॉल मारत मिडल स्टंप पाडला. करनच्या फुटवर्कनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.  इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू हॅरी कॅने (Harry Kane) याला करनचीच गरज आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. इंग्लंडनं डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारानं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 111 रन काढले होते. त्यानंतर पावसामुळे इंग्लंडला 103 रनचं लक्ष्य देण्यात आले. ते इंग्लंडने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. सॅम करननं 8 रन देऊन 1 विकेट घेतली. तसंच नाबाद 16 रन काढले. इंग्लंडकडून लियम लिविंगस्टोननं सर्वात जास्त 29 रन काढले. तर श्रीलंकेकड़ून कुशल मेंडिसनं सर्वाधिक 39 रन काढले. टीम इंडियाच्या खेळाडूंचा चिमुरडीवरील उपचारासाठी पुढाकार, 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज तीन सामन्यांच्या या टी 20 मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनंच जिंकला होता. गुरुवारी मिळवलेल्या विजयानंतर आता  इंग्लंडकडं 2-0 अशी आघाडी आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 26 जून रोजी होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, England, Sri lanka, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या