मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अजब योगायोग! एकाच दिवशी मॅचच्या शेवटच्या 3 बॉलवर दोघांची HATTRICK

अजब योगायोग! एकाच दिवशी मॅचच्या शेवटच्या 3 बॉलवर दोघांची HATTRICK

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट (Vitality Blast) क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन बॉलर्सनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही मॅचच्या शेवटच्या तीन बॉलवर हा पराक्रम केला.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 3 जुलै :  क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सलग तीन बॉलवर बॅट्समनला आऊट करणे म्हणजेच  हॅट्ट्रिक (Hattrick) घेणे हा प्रकार दुर्मिळ आहे. पण इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट  (Vitality Blast) क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन बॉलर्सनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही मॅचच्या शेवटच्या तीन बॉलवर हा पराक्रम केला. न्यूझीलंडच्या एडम मिल्नेनं  (Adam Milne) केंटकडून तर लॉकी फर्ग्युसननं (lockie ferguson) यॉर्कशरकडून खेळताना हॅट्ट्रिक घेतली.

यॉर्कशर विरुद्ध लँकशर मॅचमध्ये फर्ग्युसननं हॅट्ट्रिक घेतली. फर्ग्युसननं सुरुवातीला कॅप्टन डेन विलासला आऊट केले होते. त्यानंतर रॉब जोन्सनं 48 बॉलमध्ये नाबाद 61 रन काढत जोरदार संघर्ष केला, पण त्याला साथ मिळाली नाही. फर्ग्युसननं इनिंगच्या शेवटच्या तीन बॉलवर ल्यूक वेल्स, ल्यूक वूड आणि टॉम हर्टली यांना आऊट करत त्याची हॅट्ट्रिक  पूर्ण केली आणि यॉर्कशरला विजय मिळवून दिला.

राहुल, मयंक नाही तर सध्या श्रीलंकेत असलेला खेळाडू घेणार शुभमन गिलची जागा?

मिल्नेची कमाल

केंट विरुद्ध सरे यांच्यातील मॅचमध्ये देखील हाच प्रकार घडला. केंटनं सरेला विजयासाठी 191 रनचं टार्गेट ठेवलं होतं. सरेची सुरुवात खराब झाली पण त्यानंतर विल जॅक्सनं 54 बॉलमध्ये 87 रन करत टीमला विजयाच्या जवळ आणलं होतं. त्यावेळी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून (MI) खेळणाऱ्या मिल्नेनं शेवटच्या तीन बॉलवर मॅचचं चित्रं बदललं. मिल्नेनं न्यूझीलंडचा ऑल राऊंडर काईल जेमिसनसह तिघांना आऊट करत केंटला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये मिल्नेनं 38 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या.

First published:

Tags: Cricket, England, New zealand