• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • The Hundred : इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, टीमचा मुख्य प्रशिक्षक पॉझिटिव्ह

The Hundred : इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, टीमचा मुख्य प्रशिक्षक पॉझिटिव्ह

इंग्लंडमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान कोरोना पेशंट्स आढळण्याचे प्रकार कायम आहेत. 'द हंड्रेड' (The Hundred) या स्पर्धेलाही कोरोनाचा फटका बसला आहे.

 • Share this:
  लंडन, 2 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान कोरोना पेशंट्स आढळण्याचे प्रकार कायम आहेत. महिनाभरापूर्वी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या मालिकेच्यापूर्वी इंग्लंड टीमला कोरोनाचा फटका बसला होता. त्यामुळे त्यांना संपूर्ण टीमच बदलावी लागली. त्यानंतर आता 'द हंड्रेड' (The Hundred) या स्पर्धेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर आणि लंडन स्पिरीट या टीमचे मुख्य प्रशिक्षक शेन वॉर्न (Shane Warne) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शेन वॉर्नसह या टीममधील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. 'क्रिकइन्फो'नं दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी वॉर्नची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याची कोरोनाचा चाचणी करण्यात आली. त्यावेळी तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्याची आणखी एक आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली असून त्या रिपोर्टची सध्या प्रतीक्षा केली जात आहे. लंडन स्पिरीट टीममधील कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती नाही. Tokyo Olympics : हॉकीतील भारताच्या विजयाचं वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा इमोशनल VIDEO द हंड्रेड स्पर्धा सुरु झाल्यानंतर कोरोनाची लागण झालेला शेन वॉर्न हा दुसरा मुख्य प्रशिक्षक आहे. यापूर्वी ट्रेंट रॉकेट्स टीमचा मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवरला मागील आठवड्यात या घातक व्हायरसची लागण झाली आहे. वॉर्नच्या लंडन स्पिरीट टीमनं तीन पैकी दोन सामने गमावले असून एका सामन्याचा निकाल लागला नाही. वॉर्नला खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये डेव्हिड रिप्ले टीमच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: