Home /News /sport /

The Hundred: 'या' क्रिकेटपटूनं रचला इतिहास, हिजाब घालून खेळणारी बनली पहिली खेळाडू

The Hundred: 'या' क्रिकेटपटूनं रचला इतिहास, हिजाब घालून खेळणारी बनली पहिली खेळाडू

इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड (The Hundred) ही क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी झालेली स्कॉटलंडची क्रिकेटपटू अबताहा मकसूद (Abtaha Maqsood) हिनं इतिहास रचला आहे.

    मुंबई, 26 जुलै: इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड (The Hundred) ही क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. एका इनिंगमध्ये 100 बॉलची मर्यादा असलेला हा क्रिकेटचा नवा प्रकार फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी झालेली स्कॉटलंडची क्रिकेटपटू अबताहा मकसूद (Abtaha Maqsood) हिनं इतिहास रचला आहे. 22 वर्षांची लेगस्पिनर अबताहा बर्मिंगहम फिनिक्स (Birmingham Phoenix) टीमची सदस्य आहे. 'द हंड्रेड' स्पर्धेतील बर्मिंगहम फिनिक्स विरुद्ध लंडन स्पिरीट (Birmingham Phoenix vs London Spirit) या मॅचमध्ये अबताहानं हिजाब घालून बॉलिंग केली. तिनं या मॅचमध्ये फक्त 5 बॉल टाकले. या 5 बॉलमध्ये तिनं 7 रन दिले. एकही विकेट तिला मिळाली नाही, तरीही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झाले आहेत. हिजाब घालून बॉलिंग करणारी ती क्रिकेट विश्वातील पहिलीच खेळाडू बनली आहे. 'ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी लहान असताना मुस्लीम खेळाडूंना कधीही हिजाब घालून खेळताना पाहिलेलं नाही. मी इतक्या मोठ्या स्पर्धेत हिजाब घालून खेळल्याबद्दल आनंदी आहे.' अशी प्रतिक्रिया अबताहानं व्यक्त केली आहे. पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवणारी भवानी देवी कोण आहे? अबताहा मकसूदची कारकिर्द तायकांडोमध्ये ब्लॅक बेल्ट जिंकणारी अबताहा 2014 साली ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Glasgow Commonwealth Games 2014) स्पर्धेत तिच्या देशाची ध्वजवाहक होती. तिनं वयाच्या 12 व्या वर्षापासून टी20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अंडर 17 टीममध्ये तिनं पदार्पण करत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, England, Muslim, Sports

    पुढील बातम्या