Home /News /sport /

The Hundred: मुंबईकर क्रिकेटरचं इंग्लंडमध्ये वादळ,18 बॉलमध्ये काढले 74 रन

The Hundred: मुंबईकर क्रिकेटरचं इंग्लंडमध्ये वादळ,18 बॉलमध्ये काढले 74 रन

मुंबईकर जेमिमा रोड्रिग्सनं (Jemima Rodrigues) शनिवारी वादळी खेळी करत अडचणीत सापडलेल्या तिच्या टीमला विजय मिळवून दिला. जेमिमानं फक्त 43 बॉलमध्ये 92 रन केले. या खेळीत जेमिमाचा स्ट्राईक रेट 213.9 इतका होता

    लंडन, 25 जुलै: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 'द हंड्रेड' (The Hundred) क्रिकेट स्पर्धेतील रंगत वाढू लागली आहे. शनिवारी या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी पाहयला मिळाली. महिला आणि पुरष या दोन्ही गटामध्ये ही स्पर्धा होत आहे. बीसीसीआयनं महिला क्रिकेटर्सना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाच भारतीय क्रिकेटर ही स्पर्धा खेळत आहेत. यापैकी मुंबईकर जेमिमा रोड्रिग्सनं (Jemima Rodrigues) शनिवारी वादळी खेळी करत अडचणीत सापडलेल्या तिच्या टीमला विजय मिळवून दिला. जेमिमानं फक्त 43 बॉलमध्ये 92 रन केले. या खेळीत जेमिमाचा स्ट्राईक रेट 213.9 इतका होता. जेमिमाच्या आक्रमक खेळीच्या जोरावर नॉर्दन सुपरचार्जर्सनं वेल्स फायरचा 6 विकेट्सनं पराभव केला. सुपरचार्जला विजयासाठी 131 रनचं टार्गेट होतं. हे टार्गेट त्यांनी 85 बॉलमध्येच पूर्ण केले. या टार्गेटचा पाठलाग करताना सुपर चार्जर्सची सुरुवात खराब झाली 18 बॉलनंतर त्यांची अवस्था 4 आऊट 19 अशी होती. ओपनिगला आलेल्या जेमिमाच्या खेळावर याचा फरक पडला नाही. तिने फक्त 26 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर तिचा वेग आणखी वाढला. Tokyo Olympics: शूटर मनू भाकर ठरली दुर्दैवी, ऐनवेळी दगा झाल्यानं हुकलं मेडल जेमिमानं 17 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 92 रन केले. याचाच अर्थ म्हणजे तिने फक्त 18 बॉलमध्येच 74 रन काढले.जेमिमाला एलाईस  रिचर्ड्सनं 23 रन काढत चांगली साथ दिली. एलिससोबत जेमिमानं 112 रनची नाबाद भागिदारी करत टीमला विजय मिळवून दिला. जेमिमानं  महिलांच्या गटातील हंड्रेडध्ये सर्वोच्च  स्कोर नोंदवला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Sports

    पुढील बातम्या