The Hundred : भारतीय कॅप्टननं गाजवली पहिली मॅच, इंग्लंडच्या बॉलर्सची केली धुलाई

इंग्लंडमध्ये द हंड्रेड (The Hundred) हा क्रिकेटचा नवा प्रकार सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिनं आक्रमक बॅटींग करत इंग्लिश बॉलर्सची धुलाई केली.

इंग्लंडमध्ये द हंड्रेड (The Hundred) हा क्रिकेटचा नवा प्रकार सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिनं आक्रमक बॅटींग करत इंग्लिश बॉलर्सची धुलाई केली.

  • Share this:
    लंडन, 22 जुलै: इंग्लंडमध्ये द हंड्रेड (The Hundred) हा क्रिकेटचा नवा प्रकार सुरू झाला आहे. या स्पर्धेतील मॅचमध्ये एक इनिंग 100 बॉलची असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या क्रिकेटच्या या सर्वात छोट्या प्रकाराला बुधवारी रात्री सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिनं आक्रमक बॅटींग करत इंग्लिश बॉलर्सची धुलाई केली. या स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना खेळण्याची परवानगी नाही. मात्र महिला क्रिकेटपटूंना खेळण्याची एनओसी बीसीसीआयनं दिली आहे. त्यानुसार हरमनप्रीत कौरसह, स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या पाच क्रिकेटर वेगवेगळ्या टीमकडून खेळणार आहेत. 'द हंड्रेड' स्पर्धेतील पहिली मॅच मँचेस्टर ओरिजनल्स विरुद्ध ओव्हल इन्व्हिसिबल यांच्यात झाली.इंग्लंडच्या केट क्रॉसच्या कॅपटनसीमध्ये खेळणाऱ्या मँचेस्टरनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 100 बॉलमध्ये 6 आऊट 135 रन केले. हरमनप्रीत कौरनं फक्त 16 बॉलमध्ये 6 फोरसह 29 रन काढले. तिचा या मॅचमधील स्ट्राईक रेट हा 181.25 इतका होता. मँचेस्टरकडून लिजेल लीनं सर्वाधिक 42 रन काढले. पहिल्या टेस्टचा संभ्रम दूर, कोरोनाग्रस्त ऋषभ पंतबाबत BCCI ची मोठी घोषणा हरमनची खेळी व्यर्थ हरमनप्रीतच्या आक्रमक खेळीनंतरही तिची टीम पराभूत झाली. ओव्हलनं 2 बॉल आणि 5 विकेट्स राखत मँचेस्टरचा पराभव केला. ओव्हलची कॅप्टन डॅन निकर्कनं 42 बॉलमध्ये आठ फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 56 रन काढले. मँचेस्टरकडून कॅप्टन केट क्रोसनं तीन विकेट्स घेतल्या. मात्र तिची कामगिरी टीमली विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही.
    Published by:News18 Desk
    First published: