मुंबई, 22 जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड (India women vs England) यांच्यातील मालिकेत हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet Kaur) फॉर्म साधारण होता. इंग्लंड विरुद्ध झालेली एकमेव टेस्ट आणि वन-डे सामन्यांच्या मालिकेत हरमनप्रीत अपयशी ठरली. टी 20 मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात हरमनप्रीतनं फॉर्ममध्ये परत येण्याचे संकेत दिले होते. इंग्लंडमध्ये बुधवारी सुरु झालेल्या द हंड्रेड (The Hundred) या नव्या क्रिकेट प्रकारातील पहिल्याच मॅचमध्ये हरमनप्रीतनं आक्रमक खेळी केली.
'द हंड्रेड' स्पर्धेतील पहिली मॅच मँचेस्टर ओरिजनल्स विरुद्ध ओव्हल इन्व्हिसिबल यांच्यात झाली.इंग्लंडच्या केट क्रॉसच्या कॅपटनसीमध्ये खेळणाऱ्या मँचेस्टरनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 100 बॉलमध्ये 6 आऊट 135 रन केले. हरमनप्रीत कौरनं फक्त 16 बॉलमध्ये 6 फोरसह 29 रन काढले. तिचा या मॅचमधील स्ट्राईक रेट हा 181.25 इतका होता. हरमनप्रीतच्या या खेळीबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. इंग्लंडच्या क्रिकेट टीमचा सदस्य सॅम बिलिंग्जनं (Sam Billings) देखील हरमनप्रीतची प्रशंसा करणारे ट्विट केले आहे.
Harmanpreet Kaur is a gun!
— Sam Billings (@sambillings) July 21, 2021
हरमनप्रीतची खेळी व्यर्थ
हरमनप्रीतच्या आक्रमक खेळीनंतरही तिची टीम पराभूत झाली. ओव्हलनं 2 बॉल आणि 5 विकेट्स राखत मँचेस्टरचा पराभव केला. ओव्हलची कॅप्टन डॅन निकर्कनं 42 बॉलमध्ये आठ फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 56 रन काढले. मँचेस्टरकडून कॅप्टन केट क्रोसनं तीन विकेट्स घेतल्या. मात्र तिची कामगिरी टीमली विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही.
Raina Brahmin Controversy: देशातील पहिल्या दलित क्रिकेटपटूबद्दल माहिती आहे का?
या स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेटपटूंना खेळण्याची परवानगी नाही. मात्र महिला क्रिकेटपटूंना खेळण्याची एनओसी बीसीसीआयनं दिली आहे. त्यानुसार हरमनप्रीत कौरसह, स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या पाच क्रिकेटर वेगवेगळ्या टीमकडून खेळणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England