मुंबई, 10 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमनं तब्बल 24 वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणार (Australia Tour Of Pakistan 2022) असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात 3 टेस्ट 3 वन-डे सह टी20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या घोषणेनंतर आता आणखी एक देश पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या आधी आणि नंतर हा दौरा होणार आहे.
इंग्लंडची टीम पुढच्या वर्षी पाकिस्तानचा (England tour of Pakistan) दौरा करणार आहे. या दौऱ्यात पाच ऐवजी 7 टी20 मॅच खेळण्यास इंग्लंड क्रिकेट बोर्ड तयार झालं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉप हॅरीसन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ही सीरिज होणार आहे. तसंच ऑस्ट्रेलियातील टी20 वर्ल्ड कप झाल्यानंतर इंग्लंडची टीम पुन्हा एकदा पाकिस्तानात येणार आहे.
इंग्लंडची टीम तेव्हा पाकिस्तानच्या विरूद्ध 3 टेस्ट मॅच खेळणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकात याचा समावेश आहे. 'पाकिस्तानमध्ये इंग्लंडची पुरुष आणि महिला क्रिकेट टीम खेळण्याच्या आमच्या कटिबद्धतेचं हे उदाहरण आहे.' असं हॅरीसन यांनी सांगितलं.
पाकिस्तान क्रिकेटशी मलालाच्या पतीचे आहेत जवळचे संबंध, या फ्रँचायझीचेही होते मालक
इंग्लंडची पुरूष क्रिकेट टीम या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2005 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करणार होती.तर महिला टीम पहिल्यांदाच पाकिस्तानात येणार होती. पण खेळाडूंच्या मानसिक, शारीरिक आणि सुरक्षेच्या कारणांमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं दोन्ही टीमचा पाकिस्ता दौरा रद्द केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England