• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? 'या' टीमना बसणार मोठा फटका

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? 'या' टीमना बसणार मोठा फटका

भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आयपीएल 2021 (IPL 2021) मधील उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे.

  • Share this:
    मुंबई, 28 मे: भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आयपीएल 2021 (IPL 2021) मधील उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरुवात होण्याची शक्यता असून 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे. इंग्लंडचा कोणताही खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही, असे इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी स्पष्ट केले आहे. 'इएसपीएन क्रिकइन्फो' शी बोलताना जाईल्स यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या खेळाडूंना आराम देऊ पण आयपीएल खेळण्याची परवानगी देणार नाही. आमचा कार्यक्रम निश्चित आहे. आमचे सर्वोत्तम खेळाडू टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आणि अ‍ॅशेस सीरिजसाठी फिट असावेत, अशी बोर्डाची इच्छा आहे." ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमचे देखील टी 20 वर्ल्ड कपपूर्वी भरगच्च वेळापत्रक आहे. सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये ऑस्ट्रेलिया 5 टी20 आणि 3 वन-डे मॅच खेळणार आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 मध्ये इंग्लंडचे 12 आणि ऑस्ट्रेलियाचे 18 खेळाडू खेळत होते. यापैकी इंग्लंडचा इयन मॉर्गन तर कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये आले नाहीत तर सर्वात जास्त फटका दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या टीमना बसणार आहे. राजस्थानची टीम तर इंग्लंडच्या खेळाडूंवर पूर्णपणे अवलंबून आहे. WTC Final: फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर विजेता कोण? ICC नं घेतला निर्णय आयपीएलमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चेन्नई सुपर किंग्स : सॅम करन, मोईन अली, जेसन बेहरनडॉर्फ कोलकाता नाईट रायडर्स : इयन मॉर्गन, पॅट कमिन्स, बेन कटींग मुंबई इंडियन्स : ख्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : ग्लेन मॅक्सवेल, एडम झम्पा, डॅनियल ख्रिस्टीयन, केन रिचर्डसन पंजाब किंग्स : ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, राइली मेरिडेथ , मोईसेस हेनरिक्स दिल्ली कॅपिटल्स : स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉईनिस, डॅनियल सॅम्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स राजस्थान रॉयल्स :  जोस बटलर, जोफ्रा आर्चर, एण्ड्रयू टाय, लियम लिविंगस्टोन सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय
    Published by:News18 Desk
    First published: