लंडन, 15 मे : इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या नंबर वनचा एकदिवसीय संघ आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली 2015 च्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंडने जबरदस्त कामगिरी केली आहे. या महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 2019 मध्ये इंग्लंडला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
इंग्लंड सध्या पाकिस्तानसोबत 5 एकदिवसीय सामन्याची मालिका खेळत आहे. तिसऱ्या सामन्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंची चर्चा सुरु आहे. त्यांच्या खेळावरून ही चर्चा सुरु नाही तर खेळाडूंच्या बदललेल्या रुपावरून होत आहे.
इन्स्टाग्रामवर इंग्लंडच्या क्रिकेट संघाने त्यांच्या खेळाडूंचे महिलांच्या रुपातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कर्णधार इयॉन मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स, जेसन रॉय आणि क्रिस व्होक्स यांचा समावेश आहे. या क्रिकेटपटूंनी सोशल मीडिया अॅप स्नॅपचॅटवर जेंडर स्वॅप फिल्टरच्या माध्यमातून महिलांसारखा चेहरा केला आहे. हा फोटो शेअर करताना ओळखा पाहू कोण? असा कॅप्शन दिला आहे.
क्रिकेटपटूंचे हे आगळे वेगळे चेहरे पाहून चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलं आहे की इंग्लंडचे क्रिकेटपटू मुलींच्या रुपात इतके सुंदर दिसतील असं वाटलं नव्हतं. तर काहींनी त्यांचे चाहते झाल्याचं म्हटलं आहे. यावर इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू ईशा गुहा हिनेसुद्धा 'काय बोलायचं यावर' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा : दोन धावा का घेता आल्या नाही, शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा
VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!