अश्विननं इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 43 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बॅटिंग करताना 148 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 106 रन काढले. पाच विकेट्स आणि 100 रन अशी ऑल राऊंड कामगिरी एकाच टेस्टमध्ये करण्याची अश्विनची ही तिसरी वेळ आहे. या यादीमध्ये इंग्लंडचा ऑल राऊंडर इयान बोथम हाच फक्त अश्विनच्या पुढे असून त्यानं हा पराक्रम पाच वेळेस केला आहे.A moment to cherish forever! @ashwinravi99 gets his Test💯 in Chennai and Md. Siraj erupts in joy. The dressing room stands up to applaud.🙌🏾 #TeamIndia #INDvENG @paytm pic.twitter.com/ykrBhsiTbl
— BCCI (@BCCI) February 15, 2021
यापूर्वी भारताची अवस्था 6 आऊट 106 अशी असताना अश्निन बॅटींगला आला. त्यानं कॅप्टन विराट कोहलीसोबत सातव्या विकेटसाठी 96 रनची पार्टरनरशिप केली. विराट पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं संयमी खेळ करत 149 बॉलमध्ये 62 रन काढले. विराट आऊट झाल्यानंतरही अश्विननं संघर्ष सुरुच ठेवला. त्यानं तळाच्या बॅट्समनच्या मदतीनं 84 रन जोडले. अश्विननं शेवटच्या विकेटसाठी सिराजसोबत 49 रनची भागिदारी केली. सिराज 16 रनवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीचनं प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही टीमसाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत सध्या इंग्लंड 1-0 अशा आघाडीवर आहे. आता इंग्लंडला ही टेस्ट जिंकण्यासाठी 482 रनचं अवघड टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे. चेन्नई टेस्टचे अजून दोन दिवस बाकी आहे. त्यामुळे इंग्लंडकडे वेळ भरपूर आहे. मात्र स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर इंग्लंडचे बॅट्समन आणखी किती काळ तग धरणार हा खरा प्रश्न आहे.A five-for and a 💯 in the same Test: only Ian Botham has done it more often than Ashwin Ravi 👏 😮 #INDvENG
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, India vs england, R ashwin, Sports, Team india, Virat kohli