धोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा

धोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 2011 साली नॉटिंगहममध्ये झालेल्या टेस्टमध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं खिलाडू वृत्तीचं अनोखं उदाहरण सादर केलं होतं.

  • Share this:

लंडन, 14 मे : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 2011 साली नॉटिंगहममध्ये झालेल्या टेस्टमध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं खिलाडू वृत्तीचं अनोखं उदाहरण सादर केलं होतं. धोनीनं अंपायरनं आऊट दिल्यानंतरही इंग्लंडचा बॅट्समन इयन बेल (Ian Bell) याला खेळायला परत बोलावलं. धोनीच्या या खिलाडूवृत्तीची आठवण आजही क्रिकेट फॅन्सच्या मनात ताजी आहे. आयसीसीनं (ICC) यासाठी धोनीला खेळ भावनेचा पुरस्कार (ICC Spirit of Cricket Award of the Decade) देऊनही गौरवलं. आता दहा वर्षांनी या घटनेसाठी इयन बेलनं स्वत:ला जबाबदार मानत गुन्हा कबूल केला आहे.

10 वर्षांनी सत्य उघड

इयन बेलनं या घटनेच्या 10 वर्षांनंतर या विषयावर बोलताना सत्य सांगितलं आहे. " मी त्या घटनेसाठी स्वत:ला दोषी समजतो. तो बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेल्याची माझी समजूत झाली होती. तरीही मला टी ब्रेक झाला असे समजून पॅव्हिलियनच्या दिशेनं जाण्याची गरज नव्हती." असं बेलनं एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मान्य केलं आहे.

काय घडली होती घटना?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2011 साली झालेल्या नॉटिंगहम टेस्टच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडला होता. टी ब्रेकच्या पूर्वीचा बॉल बेलनं ऑन साईडला खेळला. तो बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेल्याची बेलची समजूत झाली होती आणि तो पॅव्हिलियनच्या दिशेनं चालू लागला. वास्तविक प्रवीण कुमारनं तो बॉल बाऊंड्री लाईनवर अडवला आणि महेंद्रसिंह धोनीच्या दिशेनं फेकला. धोनीनं तात्काळ नॉन स्ट्राईकर एंडला उभ्या असलेल्या अभिनव मुकंदकडं थ्रो केला. मुकुंदनं एका क्षणाचाही विलंब न करता बेलला रन आऊट केले.

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

बेल रनआऊट झाला अशीच सर्वांची समजूत होती. मात्र धोनीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानं खिलाडूवृत्ती दाखवत बेलली पुन्हा एकदा बॅटींगला करण्याची परवानगी दिली. यावेळी सर्व प्रेक्षकांनी टाळ्याच्या गजरात भारतीय टीमचं अभिनंदन केलं. बेलनं त्या इनिंगमध्ये 159 रन काढले.

Published by: News18 Desk
First published: May 14, 2021, 1:42 PM IST

ताज्या बातम्या