मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

16 वर्षाच्या खेळाडूनं रचला इतिहास, 131 वर्षांमध्ये पहिल्यांदाच झाला विश्वविक्रम

16 वर्षाच्या खेळाडूनं रचला इतिहास, 131 वर्षांमध्ये पहिल्यांदाच झाला विश्वविक्रम

इंग्लंडचा क्रिकेटपटू डॅनियल इब्राहिम  (Danial Ibrahim) याने 16 व्या वर्षीच इंग्लिश क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. गेल्या 131 वर्षांमध्ये न झालेला विश्वविक्रम त्याने पहिल्याच मॅचमध्ये नोंदवला आहे.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 5 जून : इंग्लंडचा क्रिकेटपटू डॅनियल इब्राहिम  (Danial Ibrahim) याने 16 व्या वर्षीच इंग्लिश क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने 16 वर्ष आणि 299 दिवसांचा असताना कौंटी चॅम्पियनशिपमध्ये  (county championship) अर्धशतक झळकावले. 131 वर्षांच्या कौंटी क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण बॅट्समन बनला आहे. यॉर्कशर विरुद्ध या तरुण खेळाडूनं बॅटींग आणि बॉलिंगमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्यानं सुरुवातीला 134 बॉलमध्ये 55 रनची खेळी केली. त्यानंतर टॉम कॅडमोर याला आऊट करत फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली.

शाळेत शिकत असणाऱ्या डॅनियलनं बिलाल शफायत याचा रेकॉर्ड 61 दिवसांच्या फरकाने मोडला आहे. बिलालनं 2001 साली मिडलेक्सकडून खेळताना नॉटिंघमशरच्या विरुद्ध 72 रनची खेळी केली होती. डॅनियलला आपण ससेक्सकडून पदार्पण करणार असल्याची कोणतीही माहिती रविवारपर्यंत नव्हती. आता त्याने क्रिकेट इतिहासात नव्या रेकॉर्डची नोंद केली आहे.

'मी खेळणार असल्याचं समजल्यावर धक्का बसला होता. पण, मी खूप उत्साहित होतो. माझ्या पदार्पणासाठी हेडिंग्ले हे सर्वोत्तम मैदान होते.' असे इब्राहिमनं यावेळी सांगितले.

लीडसवरील ग्रुप 3 च्या या मॅचमध्ये यॉर्कशरनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ससेक्सची पहिली इनिंग 313 रनवर संपुष्टात आली. त्यामध्ये डॅनियलनं 134 बॉलमध्ये 55 रनचे योगदान दिले.

भारताकडे विराट कोहलीची मागणी करणारी पाकिस्तानी महिला कोण आहे? पाहा PHOTOS

ससेक्सचा कॅप्टन बेन ब्राऊन याने 127 रन काढले. डॅनियलनं कॅप्टनला चांगली साथ देत टीमची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने या खेळीत 8 फोर लगावले. यानंतर यॉर्कशरनं दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत 2 आऊट 273 रन काढले आहेत. डेव्हिड मलान 103 आणि गॅरी बॅलन्स 74 रन काढून दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस नाबाद होते.

First published:

Tags: Cricket, England