Home /News /sport /

रॉबिन्सन प्रकरणानंतर ECB नं घेतला धडा, खेळाडूंबाबत घेणार कठोर निर्णय

रॉबिन्सन प्रकरणानंतर ECB नं घेतला धडा, खेळाडूंबाबत घेणार कठोर निर्णय

फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्या वादग्रस्त ट्विटमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) जागं झालं आहे.

    लंडन, 13 जून: फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्या वादग्रस्त ट्विटमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) जागं झालं आहे. रॉबिन्सनवर आठ वर्षींपूर्वी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे ईसीबीनं निलंबनाची कारवाई केली आहे. आता अन्य खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटची (Social Media Account) चौकशी करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. या खेळाडूंच्या पोस्ट आक्षेपार्ह आढळल्या तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. रॉबिन्सननं न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण केले. त्याच्या पदार्पणानंतर त्याचे जुने ट्विट्स व्हायरल (Tweets Viral) झाले. या वर्णद्वेषी ट्विट्समुळे मोठा गदारोळ झाला. अखेर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सनला निलंबित करण्यात आले आहे. ईसीबीच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, “ बोर्डाच्या कार्यकारी समितीनं सोशल मीडियाची समीक्षा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये कोणत्याही जुन्या मुद्याचा निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंना त्यांची वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करुन देण्यात येईल. त्यामुळे त्यांना या प्रकरणात धडा मिळेल.” “या प्रक्रियेमुळे भविष्यात कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये संरक्षण मिळणार नाही. मात्र या संकटाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग होईल ’’ अशी आशा बोर्डाने व्यक्त केली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूला द्रविडचा इशारा, म्हणाला... ईसीबीचे अध्यक्ष इयन वाटमोर यांनी देखील बोर्डाच्या विविधता आणि समावेशकता या धोरणाची आठवण करुन दिली आहे. “क्रिकेट हा सर्वांसाठी खेळ व्हावा यासाठी राष्ट्रीय संस्था म्हणून आम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण द्यावे लागेल. त्याचबरोबर त्यांना सार्वजनिक स्तरावर स्वत:ला व्यक्त करण्यासाठी जागा द्यावी लागेल. आम्ही खेळाडूंच्या कृतीची चौकशी करणार असून गरज पडली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत.” असे त्यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, England, Social media

    पुढील बातम्या