इंग्लंडच्या कर्णधारावर निलंबनाची कारवाई, इतर खेळाडूंनाही दंड

इंग्लंडच्या कर्णधारावर निलंबनाची कारवाई, इतर खेळाडूंनाही दंड

आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला मोठा धक्का बसला असून कर्णधार इयॉन मॉर्गनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

ब्रिस्टल, 15 मे : आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत नंबर एकला असलेल्या इंग्लंडच्या संघाची सध्या जबरदस्त कामगिरी सुरु आहे. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दिलेलं 359 धावांचं आव्हान त्यांनी सहज पार केलं. 359 धावांचं लक्ष्य 44.5 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या इंग्लंडला मॅच रेफ्रींनी दणका दिला आहे. इयॉन मॉर्गनवर एका सामन्यासाठी निलंबीत करण्यात आलं आहे.

ब्रिस्टल इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडने संथ गतीने षटके टाकली होती. त्यानंतर रेफ्रींनी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनवर कारवाई केली. एका सामन्याच्या निलंबनासह सामन्याचे मानधनाच्या 40 टक्के इतका दंड केला आहे. फक्त इय़ॉन मॉर्गनच नाही तर इंग्लंडच्या इतर खेळाडूंनासुद्धा 20 टक्के रकमेचा दंड केला आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळताना संथ गतीने षटके टाकल्याने दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेतली. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकची 151 धावांची विश्वविक्रमी खेळी व्यर्थ गेली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला सामनावीर पुरस्कार मिळाला.

पाकिस्तानने दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 105 चेंडूत 159 धावांची भागिदारी केली. जेसन रॉयने 55 चेंडूत 76 धावा केल्या. त्यानंतर बेअरस्टोने जो रूटसोबत 75 धावांची भागिदारी केली. बेअरस्टोला जुनैद खानने बाद करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. बेअरस्टोने 93 चेंडूत 15 चौकार आणि 5 षटकारांसह 128 धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्सने 37 तर मोइन अलीने 46 धावा केल्या. रुट आणि स्टोक्स बाद झाल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि मोइन अली यांनी 45 व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

वाचा : World Cup : आपल्याच देशाविरुद्ध खेळून 'हा' ठरला होता सामनावीर

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानचे दोन फलंदाज लवकर बाद झाले. इंग्लंडच्या क्रिस व्होक्सने फखर जमान आणि बाबर आजम यांना बाद केलं. दुसऱ्या बाजूने इमाम उल हकने शतकी खेळी साकार केली. सर्वात कमी डावात 6 शतक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 27 एकदिवसीय सामन्यात सहा शकते केली आहेत.

वाचा : दोन धावा का घेता आल्या नाही, शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा

इमाम उल हकला हॅरिस सोहेल (41 धावा), कर्णधार सर्फराज अहमद (27 धावा)असिफ अली (52 धावा) यांनी साथ दिली. इमामने 131 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकारासह 151 धावा केल्या. टॉम करनने त्याला बाद केले. इंग्लंडकडून गोलंदाज क्रिस व्होक्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टॉम करनने दोन तर डेव्हिड विली आणि लियाम प्लंकेटने प्रत्येकी एक गडी बाद केला.

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

First published: May 15, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या