मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: इंग्लंड क्रिकेट बोर्ड निर्णयावर ठाम, BCCI च्या अडचणीत भर

IPL 2021: इंग्लंड क्रिकेट बोर्ड निर्णयावर ठाम, BCCI च्या अडचणीत भर

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आयोजनासाठी धावपळ करत असलेल्या बीसीसीआयला (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) धक्का दिला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आयोजनासाठी धावपळ करत असलेल्या बीसीसीआयला (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) धक्का दिला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आयोजनासाठी धावपळ करत असलेल्या बीसीसीआयला (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) धक्का दिला आहे.

लंडन, 28 मे: आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) उर्वरित 31 सामने इंग्लंडमध्ये होणार अशी सुरुवातीला चर्चा होती. त्यानंतर आता उर्वरित स्पर्धा युएईमध्ये होणार हे निश्चित झाले असल्याचे वृत्त आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेचा उर्वरित सिझन सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी धावपळ करत असलेल्या बीसीसीआयला (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) धक्का दिला आहे.

इंग्लंडचा कोणताही खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही, असे इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत बदल करण्याची कोणतीही विनंती बीसीसीआयने केलेली नाही. त्यांनी ही विनंती केली तरी, आमचे उत्तर नाही असेल, असे जाईल्स यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बदल करण्याची विनंती बीसीसीआयनं केली आहे, असे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले आहे.

खेळाडूंना आराम देणार

'इएसपीएन क्रिकइन्फो' शी बोलताना जाईल्स यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या खेळाडूंना आराम देऊ पण आयपीएल खेळण्याची परवानगी देणार नाही. आमचा कार्यक्रम निश्चित आहे. आमचे सर्वोत्तम खेळाडू टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आणि अ‍ॅशेस सीरिजसाठी फिट असावेत, अशी बोर्डाची इच्छा आहे."

इंग्लंड टीमचे वेळापत्रक काय?

आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. त्या काळात इंग्लंडची टीम बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध मालिका खेळणार आहे. इंग्लंड बोर्ड आगामी टी 20 वर्ल्ड कपचा विचार करत काही खेळाडूंना या दरम्यान विश्रांती देण्याची शक्यता आहे.

'रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होणार', निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा दावा

या टीमना बसणार फटका

इंग्लंडच्या खेळाडूंची अनुपस्थितीचा मोठा परिणाम आयपीएल स्पर्धेवर होणार आहे. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद या टीमना याचा मोठा फटका बसू शकतो. ऑस्ट्रेलियन टीमचे देखील सप्टेंबरमधील वेळापत्रक व्यस्त आहे. त्यामुळे त्यांचा देखील सहभाग अनिश्चित आहे.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket news, England, Ipl