Home /News /sport /

Ashes Party : दारू पार्टीचे पडसाद, इंग्लंडच्या कोचची होणार हकालपट्टी!

Ashes Party : दारू पार्टीचे पडसाद, इंग्लंडच्या कोचची होणार हकालपट्टी!

अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) संपल्यानंतर दोन्ही टीमच्या काही खेळाडूंनी रात्रभर पार्टी केल्याचं उघड झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) संपल्यानंतर दोन्ही टीमच्या काही खेळाडूंनी रात्रभर पार्टी केल्याचं उघड झाले होते. या प्रकरणाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. इंग्लंड  क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे. या चौकशीनंतर इंग्लंड क्रिकेट टीमचे बॅटींग कोच ग्रॅहम थोर्पे (Graham Thorpoe) यांची हकालपट्टी होण्याची चिन्हं आहेत. या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार इंग्लंडचा कॅप्टन जो रूट, फास्ट बॉलर जेम्स अँडरसन तसेच ऑस्ट्रेलिया टीममधील नॅथन लायन, ट्रेव्हिस हेड आणि अ‍ॅलेक्स कॅरी या पार्टीत सहभागी झाले होते. ग्रॅहम थोर्पे यांनी या पार्टीचा व्हिडीओ शूट केला. त्यामध्ये ते नॅथन लायन, जो रूट आणि अँडरसनच्या नावाचा उल्लेख करत आहेत. त्याचबरोबर आपण हा व्हिडीओ वकिलांसाठी शूट केल्याचे सांगत, उद्या सकाळी भेटू असा त्यांचा आवाज ऐकू येत आहे. होबार्टमधील हॉटेलच्या गच्चीवरील हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला असून, सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत एका बॅकग्राउंडला असलेल्या मोठ्या घड्याळात 6.30 वाजल्याचं दिसत आहे. याचाच अर्थ या क्रिकेटर्सनं रात्रभर जोरदार पार्टी केली. 'गोंधळ खूप वाढलाय. तुम्हाला यापूर्वीच पार्टी संपवायला सांगितलं आहे. मात्र तुम्ही ऐकत नसल्यानं आम्हाला इथं यावं लागलं,' असं पोलीस क्रिकेटर्सना सांगताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन बॉलरनं घेतली हॅट्ट्रिक, 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेत रचला इतिहास, VIDEO या पार्टी प्रकरणात इंग्लिश क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच माफी मागितली आसून सखोल चौकशी करण्यासाठी एका समितीची (Committee) स्थापना केली आहे. ऑस्ट्रेलियानं अ‍ॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. होबार्टमध्ये झालेली पाचवी आणि शेवटची टेस्ट तर ऑस्ट्रेलियाने फक्त 3 दिवसांमध्ये जिंकली.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या