• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • इंग्लंडच्या रद्द झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात नवा ट्विस्ट, क्रिकेटपटूंचा ECB वर आरोप

इंग्लंडच्या रद्द झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात नवा ट्विस्ट, क्रिकेटपटूंचा ECB वर आरोप

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) नुकताच पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची (England Cancelled Pakistan Tour) घोषणा केली होती. आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) नुकताच पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची (England Cancelled Pakistan Tour) घोषणा केली होती. इंग्लंड क्रिकेटपटू दौऱ्यावर जाण्यास तयार नसल्याचं सांगत इसीबीनं हा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. इंग्लंड क्रिकेटपटू संघटनेच्या ताज्या वक्तव्यानंतर या प्रकरणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं हा दौरा रद्द करण्यापूर्वी आम्हाला विचारलं नव्हतं, असा दावा टीम इंग्लंड प्लेयर पार्टनरशिप (TEPP) या इंग्लिश क्रिकेटपटूच्या संघटनेनं केला आहे. 'डेली मेल' नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पाकिस्तानचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार व्हावा का? तसंच खेळाडू या दौऱ्यावर जाण्यासाठी तयार आहेत का? याबाबतचा कोणताही प्रश्न आम्हाला इसीबीनं विचारला नाही, असा दावा या संघटनेनं केला आहे. पाकिस्तानची मोठी नाचक्की! न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द 'पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत रविवारी आमची क्रिकेट बोर्डाशी बैठक झाली. या बैठकीत हा दौरा रद्द करत असल्याचं बोर्डानं आम्हाला कळवलं. या विषयावर आम्हाला कोणतीही विचारणा करण्यात आली नाही, तसंच आमचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न बोर्डानं केला नाही,' असा दावा या संघटनेनं केला आहे. T20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा! यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी पाकिस्तानचा दौरा रद्द केल्याची घोषणा केली होती. टी-20 वर्ल्ड कपच्या सरावासाठी आम्ही पाकिस्तान दौऱ्याला तयार झालो होतो. सोबतच इंग्लंडची महिला टीमही पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती, पण सध्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची मानसिक आणि शारिरिक आरोग्य आमची प्राथमिकता आहे. पाकिस्तानला गेल्यामुळे खेळाडूंवर दबाव वाढेल. खेळाडू आधीपासूनच कोरोनामुळे त्रासलेले आहेत. या परिस्थितीमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी ही तयारी चांगली नसेल, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले होते.
  Published by:News18 Desk
  First published: