मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती

टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी 614 विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या बॉलरची निवृत्ती

भारतीय क्रिकेट टीम (Team India) पाच कसोटीच्या मालिकेसाठी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जाणार आहे. या दौऱ्यापूर्वीच इंग्लंडच्या बॉलरनं निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Team India) पाच कसोटीच्या मालिकेसाठी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जाणार आहे. या दौऱ्यापूर्वीच इंग्लंडच्या बॉलरनं निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Team India) पाच कसोटीच्या मालिकेसाठी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जाणार आहे. या दौऱ्यापूर्वीच इंग्लंडच्या बॉलरनं निवृत्ती जाहीर केली आहे.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 15 मे : भारतीय क्रिकेट टीम (Team India) पाच कसोटीच्या मालिकेसाठी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर (WTC Final) ही मालिका होणार आहे. यावर्षी भारतानं इंग्लंडचा 3-1 असा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. इंग्लंडची टीम त्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड टीमचं पुढील काही महिने क्रिकेट वेळापत्रक व्यस्त आहे. या सिझनला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांच्या फास्ट बॉलरनं वयाच्या 34 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर हॅरी गर्नीनं निवृत्ती जाहीर केलीय. (Harry Gurney announced retirement) गर्नी गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे त्रस्त होता. या दुखापतीमुळेच आपलं करियर समाप्त होत असून त्यामुळे खूप निराश असल्याची भावुक प्रतिक्रिया त्यानं दिली आहे.

'क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आली आहे. मी खांद्याच्या दुखापतीमधून सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. दुखापतीमुळे माझं करियर समाप्त होत आहे, हे खूप निराशाजनक आहे. मी 10 वर्षाचा होतो तेंव्हा पहिल्यांदा हातामध्ये बॉल घेतला होता. मी 24 वर्ष क्रिकेट खेळलो. हा प्रवास मी कधीही विसरणार नाही.' असं गर्नीनं सांगितलं.

जगभरात क्रिकेट खेळण्याचा अनुभव

गर्नीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2014 साली पदार्पण केले होते. त्याचवर्षी तो शेवटची मॅच खेळला. त्यानं 10 वन-डे आणि 2 टी 20 मॅचमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर तो जगभरातील टी20 लीगमध्ये खेळला. एक टी20 स्पेशालिस्ट बॉलर म्हणून त्याची ओळख होती. गर्नीनं मेलबर्न रेनीगेड्सकडून खेळताना बिग बॅश स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. त्याचबरोबर बार्बोडसकडून कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धा देखील जिंकली. तो 2019 साली कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून देखील खेळला आहे. गर्नीनं त्याच्या करियरमध्ये एकूण 614 विकेट्स घेतल्या आहेत.

'टीम इंडियातील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करा', माजी कोचचं गांगुली आणि द्रविडला पत्र

" इंग्लंडचं प्रतिनिधित्व करणं, आयपीएल स्पर्धेत खेळणं, घरात आणि विदेशात एकूण 8 ट्रॉफीचं विजेतेपद या उपलब्धी माझ्यासाठी खास असतील. मी क्रिकेट सोडण्यासाठी नेहमीच सज्ज होतो. आता दुखापतीमुळे माझं करियर समाप्त होत आहे. या दुखापतीनंतर पुनरागमन करणे हे पर्वत चढण्यासारखे होते,'' अशी प्रतिक्रिया गर्नीनं दिली आहे.

First published:

Tags: Cricket news, England