Home /News /sport /

बेन स्टोक्सच्या वडिलांचं न्यूझीलंडमध्ये निधन, कॅन्सरशी अपयशी झुंज

बेन स्टोक्सच्या वडिलांचं न्यूझीलंडमध्ये निधन, कॅन्सरशी अपयशी झुंज

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या वडिलांचं निधन झालं आहे. गेड स्टोक्स (Ged Stokes) यांनी न्यूझीलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला.

    मुंबई, 8 डिसेंबर : इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या वडिलांचं निधन झालं आहे. गेड स्टोक्स (Ged Stokes) यांनी न्यूझीलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेड स्टोक्स हे न्यूझीलंडचे रहिवासी होते, त्यांना डोक्याचा कॅन्सर होता. बऱ्याच काळापासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते, पण मंगळवारी त्यांच्या या लढाईला अपयश आलं आणि त्यांचा मृत्यू झाला. गेड स्टोक्स हे 65 वर्षांचे होते. गेड स्टोक्स हे रग्बी खेळाडू होते, न्यूझीलंडसाठी त्यांनी अनेक मॅच खेळल्या. गेड स्टोक्स यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचा माजी रग्बी क्लब वर्किंग टाऊनने दिली. या क्लबसाठी गेड स्टोक्स 1982-83 साली खेळले. 2003 साली ते या क्लबचे प्रशिक्षकही होते. बेन स्टोक्स हा इंग्लंडचा ऑलराऊंडर आहे. वडील आजारी असल्यामुळे बेन स्टोक्स यावर्षीच्या आयपीएलसाठी उशीरा दाखल झाला होता. स्टोक्स आयपीएलमध्ये राजस्थानच्या टीमकडून खेळतो. राजस्थानच्या टीमनेही गेड स्टोक्स यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या