मुंबई, 1 जानेवारी : इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू बेन स्टोक्स (Ben Stokes) गेल्या दशकातील प्रभावी ऑल राऊंडर आहे. आयसीसीनंही (ICC) त्याचा नुकताच सन्मान केला आहे. ICC च्या या दशकातील सर्वोत्तम टेस्ट आणि वन-डे टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. टेस्ट टीमममध्ये स्टोक्ससह एलिस्टर कुक, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे इंग्लंडचे चार खेळाडू आहेत. तर वन-डे टीममध्ये जागा मिळवणारा स्टोक्स हा एकमेव इंग्लिंश खेळाडू आहे.
दशकातील सर्वोत्तम वन-डे आणि टेस्ट टीमममध्ये निवड केल्याबद्दल स्टोक्सनं सोशल मीडियावर (Social Media) आयसीसीचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या टोपीत फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल मिश्किल प्रश्नही विचारला आहे.
काय म्हणाला स्टोक्स?
स्टोक्सनं दोन्ही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करत मिश्किल शैलीत लिहलं आहे, “मला या दोन्ही टोपींचा अभिमान आहे. त्यामधील एक टोपी बरोबर वाटत नाही. ती थोडी बॅगी आणि हिरवी आहे. धन्यवाद आयसीसी
View this post on Instagram
आयसीसीनंही त्यावर सॉरी ‘बेन स्टोक्स’ असं मजेदार उत्तर दिलं आहे.
Sorry @BenStokes38! 😂 pic.twitter.com/Z7KIuXsCsE
— ICC (@ICC) December 31, 2020
दशकातील सर्वोत्तम ऑल राऊंडर
न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्स या दशकावर प्रभाव टाकणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं 67 टेस्टमध्ये 37.84 च्या सरासरीनं 4228 रन्स काढले आहेत. त्याचबरोबर 158 विकेट्स घेतल्या आहेत. तर 95 वन-डे मध्ये त्यानं 2682 रन्स काढले असून 70 विकेट्स घेतल्या आहेत.
वर्ल्ड कप 2019 च्या ( ICC Cricket World Cup 2019) फायनलमध्ये त्यानं इंग्लंड टीमला जिंकून देणारी खेळी केली होती. त्याचबरोबर हेंडिग्ले टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या थरारक टेस्टमध्ये इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket