• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ENG vs SA: हॅट्रिक घेणाऱ्या बॉलरविरुद्ध इंग्लंडच्या 'सिक्सर किंग'चा कहर, लगावला सर्वात मोठा SIX! VIDEO

ENG vs SA: हॅट्रिक घेणाऱ्या बॉलरविरुद्ध इंग्लंडच्या 'सिक्सर किंग'चा कहर, लगावला सर्वात मोठा SIX! VIDEO

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) यांच्यात शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. इंग्लंडच्या 'सिक्सर किंग'नं या मॅचमध्ये जोरदार खेळ करत सर्वांना प्रभावित केलं.

 • Share this:
  शारजाह, 7 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) यांच्यात शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) इंग्लंडचा हा पहिलाच पराभव आहे. या पराभवातही त्यांचा 'सिक्सर किंग' लियाम लिविंग्स्टोन (Liam Livingstone) यानं त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केला. लिविंगस्टोननं 28 रनची छोटी इनिंग खेळली. पण या खेळीत त्यानं 112 मीटर लांब सिक्स लगावला. इंग्लंडच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये लिविंगस्टोननं हा सिक्स लगावला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा (Kagiso Rabada) ही ओव्हर टाकत होता. त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर लिविंगस्टोननं डिप मिडवेटच्या दिशेनं लगावलेला फटका लगावला. तो बॉल थेट स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला. हा या स्पर्धेतील सर्वात मोठा सिक्स आहे. लिविंगस्टोननं रबाडाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरही सिक्स लगावत आफ्रिकेच्या सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आणल्या. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 111 मीटर सिक्स लगावला होता.
  View this post on Instagram

  A post shared by ICC (@icc)

  रबाडाची हॅट्रिक दक्षिण आफ्रिकेच्या 190 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 रनची गरज होती, पण रबाडाने पहिल्या तीन बॉलला क्रिस वोक्स, इयन मॉर्गन आणि क्रिस जॉर्डनला माघारी धाडलं, त्यामुळे इंग्लंडचं कमबॅक अशक्य झालं. रबाडाच्या तीन विकेटशिवाय प्रिटोरियस आणि शम्सीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर एनरिच नॉर्कियाला एक विकेट घेण्यात यश आलं. T20 WC: सेमी फायनलमध्ये जाताच इंग्लंडला धक्का, प्रमुख खेळाडू आऊट! भारताला होणार फायदा रबाडाच्या हॅट्रिकनंतरही दक्षिण आफ्रिकेला सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 130 रनवर रोखण्याची गरज होती, पण इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 179 रन केल्यामुळे आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आलं.
  Published by:News18 Desk
  First published: