एजबस्टन, 14 जुलै : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात झालेली तिसरी वन-डे इंग्लंडनं 3-0 ने जिंकली. या मॅचमध्ये इंग्लंडचा स्पिनर मॅट पार्किन्सन (Matt Parkinson) याने टाकलेला एक बॉल सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. पार्किन्सननं पाकिस्तानच्या इमाम उल हकला (Imam ul Haq) हा बॉल टाकला. त्याचा हा बॉल पाहून अनेकांना ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नच्या (Shane Warne) मॅजिक बॉलची आठवण झाली.
पाकिस्तानची पहिली विकेट लवकर गेल्यानंतर इमाम उल हक आणि बाबर आझम (Babar Azam) यांनी इनिंग सावरली. एजबस्टनच्या पिचवर बॉलर्सना कोणतीही मदत मिळत नव्हती. पाकिस्तानचा स्कोर 1 आऊट 113 असा झाला होता. त्यावेळी तिसरीच वन-डे खेळणाऱ्या पार्किन्सननं हा बॉल टाकला.
पार्किन्सननं 56 रन काढणाऱ्या इमामला ओव्हर द विकेट बॉल टाकला. त्याने सहाव्या स्टंपच्या जवळ फुल बॉल टाकला. तो बॉल पाहून इमाम खूश झाला. त्याने त्यावर फोर लगावण्यासाठी ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुढच्या क्षणी जे घडलं त्यावर फक्त इमाम उल हक नाही तर प्रत्येक जण हैराण झाले.
You just can't play that
Absolute magic Scorecard/clips: https://t.co/wtCtb2kz8n #ENGvPAK @mattyparky96 pic.twitter.com/gYySs5Msju — England Cricket (@englandcricket) July 13, 2021
Tokyo Olympic: सिंधूनं शेअर केला खास Photo, फोटोमधील व्यक्ती कोण याची चर्चा सुरू
पार्किन्सनच्या बॉलवर इमामच्या बॅटचा आतली कड लागली आणि तो बॉल मिडल स्टंपला लागली. ते पाहून इमामही थक्क झाला. 'क्रिकबझ' च्या मते पार्किन्सननं हा आजवरच्या वन-डे क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक स्पिन झालेला बॉल टाकला आहे. त्याने बॉल 12.1 अंशांमध्ये वळवला. 2005 च्या एशेस सीरिजमध्येही शेन वॉर्नने अशाच प्रकारचा बॉल टाकला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, Pakistan, Video Viral On Social Media