मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs PAK: इंग्लंडच्या B टीमकडून पाकिस्तानला क्लीन स्वीप, बाबर आझमचं शतक व्यर्थ

ENG vs PAK: इंग्लंडच्या B टीमकडून पाकिस्तानला क्लीन स्वीप, बाबर आझमचं शतक व्यर्थ

जेम्स विन्सीचं (James Vince) शतक आणि लुईस ग्रेगरीचं अर्धशतक याच्या जोरावर इंग्लंडनं पाकिस्तानचा 3-0 ने पराभव केला. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babr Azam) याने झळकावलेलं शतक व्यर्थ ठरलं आहे.

  • Published by:  News18 Desk

एजबस्टन, 14 जुलै : जेम्स विन्सीचं (James Vince) शतक आणि लुईस ग्रेगरीचं अर्धशतक याच्या जोरावर इंग्लंडनं पाकिस्तानचा 3-0 ने पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडनं 3 वन-डे ची मालिका 3-0 अशी जिंकली. त्याचबरोबर बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तानवर क्लीन स्वीपची नामुश्की ओढावली आहे.

इंग्लंडचे सामूहिक प्रयत्न

पाकिस्ताननं दिलेलं 332 रनचं आव्हान पार करण्यासाठी इंग्लंडच्या बॅट्समननी सामूहिक प्रयत्न केले. अनुभवी डेव्हिड मलान (Dawid Malan) शून्यावर आऊट झाल्यानं इंग्लंडला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी सांघिक प्रयत्न करत पाकिस्तानला पराभूत केले.

जॅम्स विन्सननं 95 बॉलमध्ये 102 रन काढले. या खेळीत त्याने 11 फोर लगावले. लुईस ग्रेगरीनं 77 रन काढत विन्सीला खंबीर साथ दिली. या जोडीनं 6 विकेटसाठी 129 रनची पार्टनरशिप केली. फिल साल्ट (37), झॅक क्राऊली (39) कॅप्टन बेन स्टोक्स (32) यांनीही या विजयात योगदान दिले.

बाबर आझमचं शतक

यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने धमाकेदार शतक केले. बाबर आझमने 139 बॉलमध्ये 158 रन केले, यामध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.  बाबर आझमने इमाम उल हक (Imam Ul Haq) सोबत 92 रनची आणि मग मोहम्मद रिझवानसोबत (Mohammad Rizwan) 179 रनची मोठी पार्टनरशीप केली. मोहम्मद रिझवान 74 रन आणि इमाम उल हक 56 रन करून आऊट झाला.

कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराचा वनडे क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी शोएब मलिकच्या (Shoaib Malik) नावावर हा विक्रम होता. 2008 साली मलिकने भारताविरुद्ध नाबाद 125 रन केले होते.

मोठी बातमी! वन-डे क्रिकेटमधील पहिलीच घटना, आयर्लंडनं केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

पाकिस्तानकडून फक्त 3 बॅट्समननी दोन अंकी रन केले. तर इंग्लंडकडून 9 पैकी 7 जणांनी 10 पेक्षा जास्त रन केले. दोन टीममधील हा फरकच मॅचच्या निकालात निर्णायक ठरला.

First published:

Tags: Cricket, England, Pakistan