मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /लॉर्ड्सच्या मैदानातून टीम इंडियासाठी खूशखबर, WTC फायनलमध्ये होणार फायदा

लॉर्ड्सच्या मैदानातून टीम इंडियासाठी खूशखबर, WTC फायनलमध्ये होणार फायदा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला इंग्लंडमधील पहिल्या दिवशीच खूशखबर मिळाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला इंग्लंडमधील पहिल्या दिवशीच खूशखबर मिळाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला इंग्लंडमधील पहिल्या दिवशीच खूशखबर मिळाली आहे.

लंडन, 4 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला इंग्लंडमधील पहिल्या दिवशीच खूशखबर मिळाली आहे. सध्या लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात (ENG vs NZ) टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमध्ये केन विल्यमसनच्या (Kane Williamson) टीमची मोठी कमकुवत बाजू उघड झाली आहे. याचा टीम इंडियाला फायनलमध्ये फायदा होऊ शकतो.

लॉर्ड्स टेस्टमध्ये न्यूझीलंडची मिडल ऑर्डर अपयशी ठरली. डेवॉन कॉनवे (Devon Conway) या एकच बॅट्समन पहिल्या इनिंगमध्ये यशस्वी ठरला. त्याने टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणातच द्विशतक झळकावले. त्याच्या 200 रनच्या जोरावरच न्यूझीलंडने पहिल्या डावात 378 पर्यंत मजल मारली.

कॉनवेला हेन्री निकोलसनं 61 रन काढून चांगली साथ दिली. तर लोअर ऑर्डरचा बॅट्समन नील वेगनारने नाबाद 25 रन काढले. या दोघांशिवाय अन्य एकही बॅट्समन फार काळ टिकू शकला नाही. कॅप्टन केन विल्यमसननं फक्त 13 रन काढले. अनुभवी रॉस टेलरसह न्यूझीलंडचे अन्य बॅट्समन अपयशी ठरले. त्यांचा  हा खेळ पाहून टीम इंडियाला फायनल मॅचमध्ये रणनीती तयार करणे सोपे होणार आहे.

टीम इंडिया इंग्लंडमध्ये, पण क्वारंटाईन न होताच स्टेडियममध्ये कसे पोहोचले खेळाडू?

कॉनवेने मोडला 125 वर्ष जुना विक्रम

कॉनवे याने या सामन्यात 125 वर्ष जुनं रेकॉर्डही तोडलं आहे. याआधी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच सर्वाधिक रन करण्याचा विक्रम रणजीतसिंगजी यांच्या नावावर होता. रणजीतसिंगजी यांनी 1896 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये 154 नाबाद रनची खेळी केली होती.

कॉनवेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका

डेवॉन कॉनवेने सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. न्यूझीलंडकडून खेळलेल्या 14 टी-20 मॅचमध्ये त्याने 59.12 च्या सरासरीने 473 रन केले. तर 3 वनडेमध्ये त्याने 75 च्या सरासरीने 225 रन ठोकले. कॉनवे अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे, पण त्याची शैली एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे आहे. कॉनवे न्यूझीलंडकडून टी-20 मध्ये लागोपाठ 5 अर्धशतकं करणारा पहिला बॅट्समन आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, New zealand, Team india